Shashi Tharoor VIDEO | आधी गप्पांचा व्हिडीओ, आता सुप्रिया सुळेंना टॅग करत थरुर यांनी बॉलिवूड गाणंच लिहिलं

फारुख साहेबांना त्रास होऊ नये म्हणून सुप्रियाजी हळू आवाजात बोलत होत्या. मी त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी बाकावर खाली वाकलो होतो." अशा आशयाचं ट्वीट शशी थरुर यांनी व्हायरल व्हिडीओसंदर्भात केलं आहे.

Shashi Tharoor VIDEO | आधी गप्पांचा व्हिडीओ, आता सुप्रिया सुळेंना टॅग करत थरुर यांनी बॉलिवूड गाणंच लिहिलं
शशी थरुर आणि सुप्रिया सुळे यांचा संसदेतील गप्पांचा व्हिडीओ
Image Credit source: संसद टीव्ही
| Updated on: Apr 08, 2022 | 8:24 AM

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर (Shashi Tharoor) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा संसदेत गप्पा मारतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. यावरुन अनेक ट्विटराईट्सनी थरुर यांच्यावर मिश्कील शेरेबाजी केली आहे. त्यानंतर थरुर यांनी नेमकं काय घडलं, याविषयी ट्वीट करत ट्रोलर्सना गप्प करण्याचा प्रयत्न केला. ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’ या प्रसिद्ध हिंदी गाण्याचा संपूर्ण मुखडाच थरुर यांनी ट्वीट केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सुप्रिया सुळेंनाही मेन्शन केलं आहे.

काय म्हणाले शशी थरुर?

“लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संभाषणाची मजा घेऊ पाहणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो, की त्या मला एका धोरणांसंदर्भातील प्रश्न विचारत होत्या, कारण संसदेत बोलण्यासाठी पुढचा क्रमांक त्यांचाच होता. फारुख साहेबांना त्रास होऊ नये म्हणून सुप्रियाजी हळू आवाजात बोलत होत्या. मी त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी बाकावर खाली वाकलो होतो.” अशा आशयाचं ट्वीट शशी थरुर यांनी व्हायरल व्हिडीओसंदर्भात केलं आहे.

शशी थरुर यांचे ट्वीट वाचा :

आधीच्या ट्वीटला कोट करत शशी थरुर यांनी ‘अमर प्रेम’ चित्रपटातील ‘कुछ तो लोग कहेंगे’ या लोकप्रिय गाण्याचा संपूर्ण मुखडाच लिहिला आहे. ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना! कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई. तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहां बदनाम हुई. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना!’ आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गाणं अनेकांना चांगलंच परिचित आहे.

शशी थरुर यांनी गाण्याविषयी केलेले ट्वीट वाचा :

संबंधित बातम्या :

‘पिछे देखो पिछे, पिछे तो देखो’ फारुख अब्दुल्लांच्या भाषणावेळी मागे नेमकं काय चाललंय?