AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3450000000 रुपयांत विकत घेतला आलिशान व्हिला, पण आत शिरताच पती-पत्नीने फोडली किंकाळी…

अब्जावधी रुपये खर्च करून विकत घेतलेल्या व्हिलामध्ये पती-पत्नी जेव्हा आत शिरले तेव्हा समोर दिसलेलं अजब दृश्य पाहून त्यांचे डोळेच विस्फारले आणि त्यांनी मोठ्या किंकाळी फोडली.

3450000000 रुपयांत विकत घेतला आलिशान व्हिला, पण आत शिरताच पती-पत्नीने फोडली किंकाळी...
अब्जावधी रुपये खर्चून विकत घेतलं घर पण..
| Updated on: Feb 22, 2025 | 3:45 PM
Share

आपलं स्वतःचं एक छान घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्या घरात आपल्या कुटुंबासह आनंदी जीवन जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. असाच विचार केलेल्या पती-पत्नीने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करून एक आलिशान बंगला खरेदी केला. पण त्यांना कोणाची तरी नजर लागली. त्या बंगल्यात, व्हिलामध्ये शिरताच त्यांचा सामना अशा गोष्टीशी झाला की ते पाहूनच ते दांपत्य अतिशय घाबरलं. त्यांच्या मनात एवढी दहशत आहे की ज्यांच्याकडून त्यांना हे घर विकत घेतलंय त्यालाच ते परत करण्याची त्यांची इच्छा आहे. बघता बघता हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. आणि ते घर मूळ मालकाला परत करू शकतात, असा निर्णय कोर्टाने दिला.

काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, एका पती-पत्नीने लंडनमध्ये 40,200,000 डॉलर (3,457,200,000 अब्ज रुपये) खर्च करून एक शानदार हवेली किंवा व्हिला खरेदी केला होता. पण त्यांनी घरात प्रवेश करताच घरावर मोठ्या प्रमाणात किड्यांनी हल्ला केल्याचे दिसून आले आणि चारही बाजूंनी , सर्वत्र फक्त किड्यांचाच प्रभाव दिसत होता. हे पाहताच त्या दोघांच्याही हाता-पायातील ताकदच गेली आणि ते तेथून लगेच निघून गेले. लंडनच्या नॉटिंग हिलजवळ एका शांत, हिरव्यागार रस्त्यावर वसलेले, हॉर्बरी व्हिला हे शानदार घर होतं. पण त्या भव्य व्हिक्टोरियन घराच्या बाहेरील भागाच्या मागच्या बाजूस इन्सुलेशनमध्ये राहणाऱ्या कीटकांच्या समूहाने संपूर्ण घराचा नाश केला होता. त्या भागात एक पूल, स्पा, जिम, सिनेमा रूम आणि वाईन रूमचाही समावेश होता.

10 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या न्यायालयाच्या निर्णयानुसार, जॉर्जियन अब्जाधीशांची मुलगी इया पातार्कात्सिशविली आणि तिचा पती येव्हेन हुन्यॅक यांनी मे 2019 मध्ये सर्व्हेअर आणि रेसिडेंशिअल रिअल इस्टेट डेव्हलपर विल्यम वुडवर्ड-फिशर यांच्याकडून हे घर विकत घेतले. मात्र, त्या दांपत्याच्या सांगण्यानुसार, ते जेव्हा घरात शिरले तेव्हा त्यांना त्यांच्या टूथब्रश, टॉवेल आणि वाइन ग्लासेसवर अनेक कीटक आढळले. कीटकांनी त्यांचे कपडे देखील खराब केले होते, त्यामुळे काही कपडे फेकून द्यावे लागले. मी दररोज 10 ते 35 किडे मारतो, तर माझे कुटुंब आणि सफाई कामगार तेच काम करत असतात, असं हुन्यॅक यांनी नमूद केलं.

कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर एका न्यायाधीशाने या जोडप्याच्या बाजूने निर्णय दिला. डवर्ड-फिशरने “फसवे चुकीचे सादरीकरण” केले तसेच विक्रीपूर्वी घराच्या इन्सुलेशनमध्ये किड्यांचा वावर असल्याची बाबही लपवून ठेवली. वुडवर्ड-फिशरने घर विकण्यापूर्वी तीन प्रश्नांची खोटी उत्तरे दिली होती, तसेच त्यांनी कोणत्याही कीटकांचा प्रादुर्भाव किंवा मालमत्तेतील कोणत्याही छुप्या दोषांची माहिती दिली नव्हती, असे न्यायमूर्ती फॅनकोर्ट यांनी निर्णय देताना नमूद केलं

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...