Cow Playing Football: लोकांनी नाव दिलं,”काऊनाल्डो”! गाईचा फुटबॉल खेळताना व्हिडीओ व्हायरल

मागच्या वर्षी हर्षा भोगले यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता ज्यात गाय फुटबॉल खेळताना दिसली होती. या व्हिडिओला लोकांनी फार डोक्यावर घेतलं होतं. आता तोच व्हिडीओ पुन्हा एकदा ट्रेंड होतोय.

Cow Playing Football: लोकांनी नाव दिलं,काऊनाल्डो! गाईचा फुटबॉल खेळताना व्हिडीओ व्हायरल
Cow Playing Football
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 28, 2022 | 3:46 PM

मर्डोल, गोवा: आपल्याकडे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे खेळ खेळले जातात. काही ठिकाणी कबड्डी, काही ठिकाणी क्रिकेटचं वेड आहे. गोवामध्ये सगळ्यात जास्त खेळला जातो तो फुटबॉल (Football) ! तुम्ही सुद्धा खूप फुटबॉलच्या मॅच (Football Match) पाहिल्या असतील पण कधी गाईला फुटबॉल खेळताना पाहिलंय का? हा व्हिडीओ (Viral Video) कायम चर्चेत असणारा व्हिडीओ आहे. मागच्या वर्षी हर्षा भोगले यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता ज्यात गाय फुटबॉल खेळताना दिसली होती. या व्हिडिओला लोकांनी फार डोक्यावर घेतलं होतं. आता तोच व्हिडीओ पुन्हा एकदा ट्रेंड होतोय.

काऊनाल्डो व्हिडीओ!

गायीकडून चेंडू घेण्याचा प्रयत्न

एका गायीचा शेतात फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये गाय बॉलने खेळत असताना आपले फुटबॉल कौशल्य दाखवते. हा व्हिडिओ गोव्यातील मर्डोल भागात शूट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 2 मिनिटांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये मुलांचा एक गट मैदानात फुटबॉल खेळताना दिसत आहे, जेव्हा चेंडू गायीजवळ येतो. मुले गायीकडून चेंडू घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र गाय तो चेंडू सोडण्यास नकार देतो. व्हिडिओमध्ये गाय चेंडूला लाथ मारत असताना आणि नाकाने ढकलतानाही मैदानात फिरताना दिसत आहे. एकदा का एका खेळाडूने गायीकडून चेंडू मिळवण्यात यश मिळवले की, गायीला तो परत मिळू नये म्हणून खेळाडू चेंडू इकडेतिकडे फिरवू लागतात.