
मुंबई : सोशल मीडियावरील विश्व अगदी वेगळं असतं. येथे कधी कुठल्या गोष्टीची चर्चा होईल, याचा नेम नसतो. या मंचावर कधी प्राणी, पक्ष्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. तर कधी एखाद्या तरुण, तरुणीचा मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो. सध्या बकरीच्या दोन पिल्लांचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील बकरीच्या पिल्लांचा खेळ पाहून नेटकरी आनंदी झाले आहेत. (cute goat kids playing funny video went viral on social media)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मिनी मॅन आणि बेट्टी बू अशी बकरीचे दोन पांढरेशुभ्र पिल्लं दिसत आहेत. हे दोन्ही पिलं अगदी आनंदात आहेत. एका घरासमोर लाकडी फळी लावण्यात आल्याचे आपल्याला दिसत आहे. उतारावर लावलेल्या लाकडी फळीवर बकरीचे पिल्लं खेळत आहेत. दोघेही सोबतच लाकडी फळीवर चढत आहेत. तसेच हळूहळू उतरत आहेत. गोंडस आणि छान पिल्लांचा हा खेळ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामने त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना मजेदार असे कॅप्शन देण्यात आले आहे. जीवनात असलेल्या चढ-उतारांचा आनंद घ्या, असं कॅप्शन मध्ये सांगण्यात आलंय. बकरीच्या पिल्लांच्या या खेळाला जीवनातील चढ-उताराची उपमा देण्यात आली आहे. कदाचित याच कारणामुळे लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची निश्चित माहिती मिळालेली नाही. तरीदेखील बकरीचे निरागस पिल्लं पाहून लोकांचा मूड फ्रेश झाला आहे.
पाहा मजेदार व्हिडीओ :
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ अतिशय मजेदार असल्याचं म्हटलंय. तर काही लोकांनी व्हिडीओतील बकरीच्या पिल्लांची स्तुती केली आहे. एका नेटकऱ्याने हा व्हिडिओ खरंच अतिशय सुंदर असून अशा प्रकारचे व्हिडिओ कमी प्रमाणात पाहायला मिळतात असं म्हटलंय.
इतर बातम्या :
(cute goat kids playing funny video went viral on social media)