छोटीशी मुलगी हनुमानाचं भजन गाते, भल्या भल्यांना नाही जमणार

लहान मुलगी भजन मंडळात एका ठिकाणी बसलेली असते आणि ती जी काही ओळी गात असते. इतर स्त्रिया त्याची पुनरावृत्ती करत आहेत.

छोटीशी मुलगी हनुमानाचं भजन गाते, भल्या भल्यांना नाही जमणार
Hanuman Bhajan
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 26, 2022 | 5:44 PM

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी ट्विटरवर शेअर करण्यात आलेला एक व्हिडिओ त्याच्या क्युटनेसमुळे व्हायरल झाला होता. एक अतिशय गोंडस मुलगी व्हिडिओमध्ये भगवान हनुमान भक्त सत्संगात भजन गाताना दिसत आहे. मुलीने तिचा शाळेचा पोशाख परिधान केला आहे आणि इतर अनेक महिलांसोबत बसून हनुमान भजन गात आहे. इतक्या लहान वयात ती वादन, भजन मंडळींचे नेतृत्व करीत आहे आणि तिला संपूर्ण भजनही चांगले आठवते याचे लोकांना आश्चर्य वाटते.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लहान मुलगी भजन मंडळात एका ठिकाणी बसलेली असते आणि ती जी काही ओळी गात असते. इतर स्त्रिया त्याची पुनरावृत्ती करत आहेत.

असे दिसते की मुलीला भजन गाण्याची आवड आहे कारण तिने शाळेतून आल्यानंतर ड्रेसही बदलला नाही तेच ती मंडळात भजने गाऊ लागलीये.

या दरम्यान शेजारी बसलेल्या वृद्ध आजीने मुलीच्या हातात काही पैसे देण्याचा प्रयत्न केला मात्र तिने ते घेण्यास नकार दिला. मागे बसलेल्या महिलाही मुलीने म्हटलेल्या ओळींची पुनरावृत्ती करताना दिसल्या.

हा व्हिडिओ @Gulzar_sahab नावाच्या युझरने ट्विटरवर शेअर केला आहे. ऑनलाईन शेअर केलेल्या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आतापर्यंतचे सर्वात गोंडस भजन.”

या व्हिडीओमध्ये ही चिमुकली ‘छोटा सा हनुमान, चलवे गाडी सत्संग की…’ गाताना दिसत असून इतर महिलाही तिचं ऐकून भजन म्हणत आहेत.

हा व्हिडिओ 25 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला 1800 हून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी स्वत:च्या प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने लिहिले, ‘देवाने या गोंडस मुलीला स्वत:च्या रूपात पाठवले आहे’.