लेकीने बापाला मॅसेज केला…, १४ तासांचा प्रवास करत बाप दुसऱ्या दिवशी दारात हजर…इमोशनल व्हिडिओ

तुम्ही बापलेकीच्या प्रेमाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. परंतू बापलेकीच्या प्रेमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहूनच अनेक जण इमोशनल झाले आहेत.

लेकीने बापाला मॅसेज केला..., १४ तासांचा प्रवास करत बाप दुसऱ्या दिवशी दारात हजर...इमोशनल व्हिडिओ
Man Travels 14 Hours To Meet Daughter
| Updated on: Sep 04, 2026 | 9:56 PM

लेकीचे प्रेम बापावर जास्त असते असे म्हटले जाते. बापलेकीच्या प्रेमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. लेकीने रात्री मोबाईलवर केलेल्या ‘आय मिस यू’ अशा मॅसेजने मोठा चमत्कार घडला. या दुसऱ्या शहरात राहणाऱ्या या मुलीने जेव्हा सकाळी दरवाजा उघडला तर बापच दारात हजर झाल्याचे पाहून मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

हा साधासा मॅसेज बापलेकीचं प्रेम दर्शवणारा कसा ठरला याचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर हँडल @apple.kaivalya वरुन शेअर झाला आहे. या व्हिडिओतील मुलीने या व्हिडीओत सांगितले की गेल्या रात्री वडिलांची आठवण आली म्हणून मॅसेज केला. त्यानंतर सकाळी दार उघडले तर वडील दारात उभे राहिलेले पाहून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासोबत आठ तास घालवण्यासाठी वडील १४ तास प्रवास करुन आले आणि पुन्हा १४ तासांचा प्रवास करणार आहे. तसेच फोनवरुन ऑफीसचे कामही सांभाळत आहेत.

त्यांच्या या छोट्याशा भेटीदरम्यान, माझ्या वडिलांनी माझी भांडी घासून दिली, मला बाहेर घेऊन गेले आणि मला आवडणारे जेवणही खाऊ घातले. निघण्यापूर्वी, त्यांनी मला आनंदी राहण्यास सांगितले आणि ते नेहमीच माझ्यासोबत आहेत, याची आठवण त्यांनी करून दिल्याचे तिने या व्हिडिओत सांगितले.

येथे पोस्ट वाचा –

ती म्हणाली की आपण बोलावले म्हणून वडील आले नव्हते, तर मी एकटी नाही हे मला पटवून देण्यासाठी ते आले होते. हा भावूक व्हिडिओ शेअर करताना या तरुणीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ती वडिलांना मिस करत होती, त्यांना भेटण्याची तिची इच्छा होती आणि ते आले. तिने सांगितले की, त्यांनी १४ तासांचा प्रवास केला, तिच्यासोबत एक दिवस घालवला आणि न सांगताही अनेक लहान-सहान गोष्टी करुन मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला.

तिने पुढे म्हटले आहे की, कधीकधी आई-वडील मुलांना नेहमीच तुमच्या सोबत आहोत असे शब्दांत सांगत नाहीत. त्याऐवजी, ते प्रत्यक्ष हजर राहतात आणि आपण कधीच एकटे नाही आहोत, याची जाणीव करून देण्यासाठी तेवढेच पुरेसे असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us