AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये तो प्रसंग घेतला आहे का? भरसभेत शहाजी बापू पाटलांचा दीपाली सय्यद यांना सवाल अन्…

सांगोला येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मंत्री भरत गोगावले , मंत्री योगेश कदम , दिपाली सय्यद उपस्थित होत्या. याच मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र एपस्टीन फाईल चित्रपटाच्या चित्रिकरणात मोठा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये तो प्रसंग घेतला आहे का? भरसभेत शहाजी बापू पाटलांचा दीपाली सय्यद यांना सवाल अन्...
शहाजी बापू पाटील Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 10:04 PM
Share

मार्चमध्ये नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात यांच प्रकरण समोर आलं आणि संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांवर अत्याचार, काळी जादू, फसवणूक अशा विविध गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली. अशोक खरात याला अटक केल्यानंतर पोलीस चौकशीत त्याचे एक -एक हादरवणारे कारनामे समोर आले. दरम्यान आता लवकरच या भोंदू अशोक खरात यावर एक चित्रपट येत आहे, ज्या चित्रपटाचं नाव महाराष्ट्र एपस्टीन फाईल असं आहे, या चित्रपटामध्ये दीपाली सय्यद यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाबाबत बोलताना आता माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे, या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शहाजी बापू पाटील? 

अशोक खरातवर चित्रीत होत असणाऱ्या महाराष्ट्र एपस्टीन फाईल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एक घोटाळा झाला आहे. अशोक खरात सांगोला तालुक्यात येऊन पूजा करून गेला आहे. उघडया नागड्या पद्धतीने धिंगाणा घालून सांगोला येथील जवळ्याकडे पूजा केली. माझा भाचा असणाऱ्या अतुल पवारला निवडणुकीत पराभूत करून जीवे मारण्यासाठी पूजा केली. मात्र मी माझ्या भाच्याला सांगितले, तुझा मामा या महाराजाच्या बापाचा बाप आहे. तू मरत नाही काळजी करू नको. त्यामुळे हा प्रसंग अशोक खरात वर चित्रीत होणाऱ्या चित्रपटात घेतला आहे का ? असा सवाल माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दीपाली सय्यद यांना केला आहे.

सांगोला येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मंत्री भरत गोगावले , मंत्री योगेश कदम , दिपाली सय्यद उपस्थित होत्या. यावेळी दिपाली सय्यद यांना उद्देशून शहाजी बापू पाटील यांनी सांगोल्यातील अशोक खरातचे कारनामे सांगून माजी आमदार दीपक साळुंखे यांना टोल लगावला आहे. दरम्यान महाराष्ट्र एपस्टीन फाईल हा चित्रपट नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर असून, तो आता लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हा चित्रपट सध्या राज्यात चांगलाच चर्चेमध्ये आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच