
नवी दिल्ली: दिल्ली मेट्रोमध्ये घडणाऱ्या काही विचित्र व्हिडिओंपैकी आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. मेट्रोमध्ये एक मुलगी मास्क लावून आहे आणि ती वरचं हँडल पकडण्याचा प्रयत्न करतीये. आतापर्यंत आपण डान्सचे व्हिडीओ, जोडप्याचे व्हिडीओ पाहिलेत, बिकिनी घालून बसलेली मुलगी पाहिलीये. असे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत ज्यात बरेच विचित्र प्रकार घडलेत. हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगितलं जातंय. व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
कॅलिस्थेनिक्स हा व्यायामाचा एक नृत्य प्रकार आहे जो शरीराच्या वजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसतो. हा व्यायामाचा असा प्रकार आहे जो सामर्थ्य, सहनशक्ती, लवचिकता आणि समन्वय वाढवतं. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून (DMRC) प्रवाशांना मेट्रोच्या डब्यात व्हिडिओ चित्रीकरण किंवा नृत्य करण्यास परवानगी नाही. DMRC तसा वारंवार इशारा सुद्धा दिला जातो. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दिल्ली मेट्रोमध्ये DMRC च्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातंय. कारण दिल्ली मेट्रो मधला रोज एक व्हिडीओ व्हायरल होतो.
मेट्रोच्या आत वरचा रेलिंग बार धरून एक मुलगी कॅलिस्थेनिक्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जगजोत कौरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने यात मनगटांचा वापर करून चक्क या रेलिंगवर बॉडी फ्लिप केलीये. मेट्रोमध्ये उपस्थित असलेले लोक महिला काय करत आहे हे पाहत असल्याचे दिसत आहे. एका युजरने लिहिलं आहे की, “कौतुकास्पद, पण सार्वजनिक ठिकाणं आणि सरकारी मालमत्ता स्टंट करण्यासाठी नसतात.” आणखी एका युजरने लिहिले की, “आता मेट्रोमध्ये ही घोषणा सुरू होणार आहे. प्रवाशांनी कृपया लक्ष द्या, उलट-सुलट कामे करणे टाळा. चांगलं काम केलं आहे.”