Delhi Metro चा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल, यावेळी तर कहरच!

Delhi Metro चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. मेट्रो मधील अनेक व्हिडीओ याआधी सुद्धा व्हायरल झालेले आहेत. या व्हिडीओ मध्ये तर जबरदस्त भांडण होतायत. भांडताना ही महिला तक्रार करण्याची देखील धमकी देते. पहा व्हिडीओ.

Delhi Metro चा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल, यावेळी तर कहरच!
delhi metro viral video
| Updated on: Aug 26, 2023 | 7:25 PM

नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो हा एक चर्चेचा विषय आहे. ही मेट्रो बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध असते. बरेचदा हे व्हिडीओ इतके फेमस होतात की या व्हिडिओंची चर्चाच जास्त असते. दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडीओ याआधी सुद्धा व्हायरल झालेले आहेत. कधी या व्हिडीओ मध्ये कुणी मेट्रोमध्ये डान्स करताना दिसतं तर कधी यात कुणी मंजुलिका बनून आलेलं दिसतं. वेगवेगळे असे व्हिडीओ आहेत जे आजही लोकांना लक्षात असतील. असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात एक मुलगा मुलगी आहेत. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

हा पहिला भांडणाचा व्हिडीओ नाही

दिल्ली मेट्रोमधील हा पहिला भांडणाचा व्हिडीओ नाही जो व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एक मुलगा आणि दोन महिला मोठमोठ्याने भांडताना दिसतायत. या व्हिडीओ मध्ये एक माणूस मोठ्याने म्हणताना दिसतो की मी इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायला आलेलो नाही. हा व्हिडीओ पाहताना आधी वाटतं की हे इतक्या मोठ्या मोठ्याने बोलतायत. हा इसम खरं तर महिलांच्या डब्ब्यात चढलाय.

मी तुमची तक्रार करेल

आधी तर ही महिला त्या महिलांच्या डब्ब्यात चढलेल्या व्यक्तीशी भांड भांड भांडते. ती महिला न घाबरता त्या व्यक्तीला मी तुमची तक्रार करेल असं म्हणते. मग त्यावर तो माणूस म्हणतो की मी इथे तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाही. त्यावर महिला परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून त्या माणसाला पुढच्या स्टेशनला उतरण्याचा सल्ला देते. त्यावर तो माणूस देखील तो सल्ला मान्य करतो आणि वातावरण शांत होतं.