AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | देशी जुगाड! हा आगळावेगळा मास्क पाहून तुम्हीही चक्रावून जाल; एकदा व्हिडीओ पाहाच!

फेस मास्कसंदर्भात अनेक मजेशीर प्रकरणे समोर येत आहेत. काहींनी सोन्याचे मास्क घातले आहेत तर काहींनी चांदीचे घातले आहेत. पण, एका व्यक्तीने जुगाड वापरुन एक वेगळा मास्क तयार केला आहे. (Desi Jugaad, You too will be amazed to see this strange mask; Watch the video once)

Viral Video | देशी जुगाड! हा आगळावेगळा मास्क पाहून तुम्हीही चक्रावून जाल; एकदा व्हिडीओ पाहाच!
देशी जुगाड! हा आगळावेगळा मास्क पाहून तुम्हीही चक्रावून जाल
| Updated on: May 22, 2021 | 9:20 PM
Share

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने त्रिसूत्री सांगितली आहे. हात धुणे, मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे. लोकांना हा साथीचा त्रास टाळण्यासाठी फेस मास्क आणि सामाजिक अंतर यासारख्या नियमांचे पालन करण्यास सांगितले जाते. बरेच लोक या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. तथापि, फेस मास्कसंदर्भात अनेक मजेशीर प्रकरणे समोर येत आहेत. काहींनी सोन्याचे मास्क घातले आहेत तर काहींनी चांदीचे घातले आहेत. पण, एका व्यक्तीने जुगाड वापरुन एक वेगळा मास्क तयार केला आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Desi Jugaad, You too will be amazed to see this strange mask; Watch the video once)

व्हिडिओत मुसका बांधून फिरतोय व्यक्ती

सोशल मीडियात दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणारे रंजक आणि विनोदी व्हिडिओ पाहून सर्व जण पोट धरुन हसत असतात. मात्र सध्या सोशल मीडियात चर्चा आहे ती खास जुगाडवाल्या मास्कची. कोरोना नियम पाळला जाईल आणि त्यासोबतच आरोग्याची काळजीही घेतली जाईल असा प्रयत्न हा मास्क बनविणाऱ्या व्यक्तीने केला आहे. कोरोना आल्यापासून आपण विविध प्रकारचे मास्क पाहिले असतील. तथापि, हा मास्क अतिशय अद्वितीय आहे. एक वृद्ध माणूस अनोखा मास्क घालून फिरत होता. व्हिडिओमधील व्यक्तीने तोंडाला मुसका बांधला आहे. इतकेच नाही तर कडुलिंबाची पानेही या मास्कमध्ये भरली आहेत. आपण अशा प्रकारचा मास्क का घातला आहे? असे त्या व्यक्तीला विचारले असता, ते म्हणाले की हा मास्क फायदेशीर आहे. कारण त्यात कडूलिंबाच्या पानाबरोबरच तुळशीच्या पानांचाही वापर करण्यात आला आहे. यामुळे आपण बर्‍याच आजारांपासून दूर राहू शकतो.

जुगाडवाला मास्क

ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला ते हैराण झाले आहेत. मात्र, या बाबाजीचे कारण ऐकून लोक खूप प्रभावित झाले. हा व्हिडिओ भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी रूपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘जुगाड़ #मजबूरी_का_नाम_महात्मा_गांधी’. आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. (Desi Jugaad, You too will be amazed to see this strange mask; Watch the video once)

इतर बातम्या

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’, ‘बेल बॉटम’ स्वातंत्र्य दिनी रिलीज होणार? जाणून घ्या अक्षय काय म्हणाला?

सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.