AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’, ‘बेल बॉटम’ स्वातंत्र्य दिनी रिलीज होणार? जाणून घ्या अक्षय काय म्हणाला?

बातम्या येत आहेत की, त्याचे सुर्यवंशी आणि बेल बॉटम हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्य दिनी रिलीज होतील. पण स्वत: अक्षयने या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी', 'बेल बॉटम' स्वातंत्र्य दिनी रिलीज होणार? जाणून घ्या अक्षय काय म्हणाला?
अक्षय कुमार
| Updated on: May 22, 2021 | 9:03 PM
Share

मुंबई : अक्षय कुमारचे चित्रप सूर्यवंशी आणि बेल बॉटमच्या रिलीज डेटबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अंदाज बांधले जात होते. अक्षय कुमारचे चाहते त्याच्या या दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसंच असं पहिल्यांदाच घडत आहे की, अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी मोठी वाट पाहावी लागत आहे. अशावेळी बातम्या येत आहेत की, त्याचे सुर्यवंशी आणि बेल बॉटम हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्य दिनी रिलीज होतील. पण स्वत: अक्षयने या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. (Suryavanshi and Bell Bottom will not be released on Independence Day)

‘सूर्यवंशी आणि बेल बॉटम या चित्रपटाबाबत चाहत्यांच्या उत्साह पाहून आनंदीत आहे. त्यांच्या या प्रेमासाठी मी त्यांचा ऋणी आहे. मात्र, हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आणि केवळ अफवा आहेत. दोन्ही चित्रपटांचे निर्माते रिलीज डेटबाबत काम करत आहेत. योग्य वेळ आल्यावर दोन्ही चित्रपटांची रिलीज डेट जाहीर केली जाईल’, असं अक्षय कुमारने म्हटलंय.

सूर्यवंशीची रिलीज डेट पोस्टपोन

अक्षय कुमारचा चित्रपट सूर्यवंशी 2020 मध्ये ईद दरम्यान रिलीज होणार होता. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे तो रिलीज होऊ शकला नाही. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे चित्रिकरण आणि चित्रपटगृह बंद करण्यात आली होती. तेव्हापासूनच सूर्यवंशीची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात येत आहे. पुढे 30 एप्रिलला सूर्यवंशी रिलीज होईल असं सांगण्यात आलं होतं. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा ती पुढे ढकलली गेली आहे.

अक्षयच्या ‘बेल बॉटम’मध्ये काय?

या चित्रपटाची कहाणी बेल तळाची संबंधीत आहे. सप्टेंबर 1981 ते ऑगस्ट 1984 या विमान हाइजॅकिंगवर आधारित आहे. या हाइजॅकिंगनंतर संपूर्ण देश हादरला होता. या हाइजॅकिंगची जबाबदारी दहशतवादी संघटनांनी घेतली होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेचा लारा दत्ता दिसणार आहे. या चित्रपटात वाणी अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचे वशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी हे निर्माते आहेत. लॉकडाऊनमध्ये अक्षयनं स्कॉटलंडला जाऊन चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं. एवढंच नाही तर अक्षयनं यावेळी डबल शिफ्टमध्ये काम केलंय. अक्षयनं हे केलं कारण लॉकडाऊनमुळे या कामाला आधीच उशीर झाला होता आणि यामुळे निर्मात्यांचं नुकसान होण्याची शक्यता होती, त्यामुळे अक्षयसोबतच संपूर्ण टीमनं डबल शिफ्टमध्ये काम केलं होत.

संबंधित बातम्या :

PHOTO | रायमा सेनने ‘टॉपलेस’ फोटोशूट शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा, बोल्डनेस पाहून चाहतेही झाले घायाळ!

PHOTO | शाहरुखच्या लेकीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज, सुहाना खान पदार्पणापूर्वीच ठरतेय ‘बॉलिवूड क्वीन’!

Suryavanshi and Bell Bottom will not be released on Independence Day

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.