
आयुष्य ऐशो आरामात घालवण्यासाठी या 18 वर्षाच्या मुलाकडे सगळं काही आहे. पैसा, प्रतिष्ठा, महागडी घड्याळं, महागडे चष्मे, दागिने सर्व काही. पण त्याने या सर्वाचा त्याग केलाय. आम्ही बोलतोय, गुजरात सूरतमधल्या प्रसिद्ध डायमंड इंडस्ट्रियलिस्टचा 18 वर्षांचा मुलगा जश मेहताबद्दल. तो 23 नोव्हेंबरला जैन मुनी बनणार आहे. यशोविजय सुरेश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षा घेण्यासाठी त्याने ही लग्जरी लाइफ सोडली आहे. जश मेहताने इयत्ता 10 वी त 70 टक्के गुण मिळवले. त्याला क्रिकेट खूप आवडतं. त्याशिवाय जशला ओरिजनल डायमंड ज्वेलरी, लग्जरी घड्याळं, महागड्या कार्स, महागडे चष्मे यात इंटरेस्ट आहे. त्याची आई म्हणाली की, ‘जशने जो रस्ता निवडलाय. त्या मार्गावर संपूर्ण कुटुंब त्याला साथ देईल’
“जशने दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, याचा मला अभिमान आहे. जशला खाणं, फिरणं आवडतं.यात घड्याळं, चष्मे आणि दागिने सुद्धा आहेत. पण त्याने हे सर्व सोडण्याचा निर्णय घेतलाय” असं जशची आई म्हणाली. पाचवर्षांपूर्वीच जशची अध्यात्माकडे ओढ वाढलेली. तो काकाने घेतलेल्या दीक्षेने प्रभावित झालेला. त्याचे काका ऐशोआरामी आयुष्य जगायचे. सुरुवातीला ते धार्मिक नव्हते. एक पुस्तक वाचल्यानंतर ते पूर्णपणे बदलले. या बदलाचा जशवर परिणाम झाला.
जैन मुनी बनणं किती कठीण?
जैन मुनी बनणं सोपी गोष्ट नाही. ही एक तपस्या आहे. व्यक्तीला सर्व संसारिक सुखं सोडावी लागतात. जैन मुनीला धर्माच्या आधारावर चालताना कठीण नियम आणि शिस्त पाळावी लागते. यात अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे सिद्धांत आहेत. जैन मुनी बनण्यासाठी जैन धर्माची शिक्षा आणि शास्त्राच ज्ञान आवश्यक आहे. एका आचार्याकडे दीक्षा ग्रहण करावी लागते. दीक्षेच्या वेळी आचार्यांच्या मार्गदर्शनाखाल एक व्यक्ती जैन धर्माचे नियम समजून घेतो. त्यांचं पालन करण्याचा संकल्प घेतो. जैन मुनी बनल्यानंतर व्यक्तीला दिवसातून फक्त एकदाच भोजन करता येतं. बेड त्यागून जमिनीवर झोपावं लागतं. मुनीकडे तीन गोष्टी नेहमी असतात. कमंडल, शास्त्र आणि पिच्छी.