जबरदस्त डान्स! मुलींचा डान्स इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ

एक ग्रुप या गाण्याच्या तालावर जबरदस्त डान्स करताना दिसला आहे. या मुलींचा एक मजेशीर डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

जबरदस्त डान्स! मुलींचा डान्स इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ
Kala Chasma Dance
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 05, 2022 | 4:37 PM

‘बार बार देखो’ या बॉलिवूड चित्रपटातील काला चष्मा या गाण्याची नशा लोकांच्या डोक्यातून उतरत नाहीये. या सुपरहिट गाण्यावर रोज काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये जपानमधील मुलींचा एक ग्रुप या गाण्याच्या तालावर जबरदस्त डान्स करताना दिसला आहे. या मुलींचा एक मजेशीर डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

खरं तर हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर क्विक स्टाइल नावाच्या हँडलसह पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास दहा मुलींचा ग्रुप दिसत असून, त्या काला चष्मा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे या मुली शाळेतल्या आहेत की काय असा प्रश्न पडतो कारण त्यांनी शाळेचा गणवेश घातलाय. हेअर स्टाईल सुद्धा तशीच आहे जशी शाळेतल्या मुलींची असते.

हा व्हिडिओ पाहा

या नृत्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे गाण्याची प्रत्येक स्टेप त्यांनी उत्तम शैलीत केली आहे. आधी एक मुलगी सुरुवातीचे फ्लोअर स्टेप करताना दिसली, त्यानंतर सर्व सहकारी मुलींनी तिला साथ दिली, नंतर दुसऱ्या एका मुलीने पुढची चाल दाखवली. शेवटी सगळ्या मुलींनी एकत्र येऊन हा डान्स मस्त केला.

काला चष्मावरील हा नवीन व्हायरल व्हिडिओ लोकांना पसंत पडत आहे. यावर विविध प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

या पोस्टमधील व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही या गाण्याचा ट्रेंड जगभरात संपत नसल्याचं आश्चर्यकारकरित्या लिहिण्यात आलं आहे.