काय सांगता ! 3,682.84 कोटींचे व्यवहार झाले डिजिटल, तीन वर्षांत डिजिटल व्यवहार जवळपास दुप्पट

| Updated on: Dec 23, 2021 | 11:00 AM

भारतही डिजिटल युगात जोमाने अग्रेसर होत आहे. तीन वर्षांत भारतीयांनी खिश्यातून नोटांची बंडले न काढता ऑनलाईन पेमेंट पद्धतीने व्यवहार पूर्ण केले आहेत. विविधी मोबाईल एपचा वापर करुन भारतीयांनी व्यवहार पूर्ण केले आहे. 2018-19या आर्थिक वर्षात 2,326.02 कोटींचे डिजिटल पेमेंट.2020-21 मध्ये 4,374.45 कोटींचे डिजिटल व्यवहार पूर्ण

काय सांगता ! 3,682.84 कोटींचे व्यवहार झाले डिजिटल, तीन वर्षांत डिजिटल व्यवहार जवळपास दुप्पट
UPI
Follow us on

मुंबई : कधीही, कुठेही आणि सुरक्षितपणे व्यवहार करण्याचा मूलमंत्र देणा-या डिजिटल पेमेंट सुविधेमुळे देशातील अर्थकारण बदलून गेले आहे. सोपी आणी सुविधाजनक ऑनलाईन पेमेंट पद्धतीने अर्थक्रांती आणली आहे. गेल्या तीन वर्षांतील डिजिटल व्यवहारांची आकडेवारी सरकारसाठीच नाहीतर डिजिटल व्यवहारात सहभागी नागरिकांसाठी सुखद धक्का देणारी आहे. हे आकडे आश्वासक असून भारतीय अर्थव्यवस्थेतील या डिजिटल क्रांतीकडे जागतिक कंपन्यांनी लक्ष ठेऊन आहेत.

88 टक्क्यांची गरुडझेप

डिजिटल पेमेंटविषयी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी राज्यसभेत याविषयीची आकडेवारी सादर केली. रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने सदर केलेल्या आकडेवारी अहवालानुसार, 2018-19 या आर्थिक वर्षात 2,326.02 कोटींचे ऑनलाईन व्यवहार पूर्ण झाले. हेच प्रमाण 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 3400.25 कोटी होते. तर यावर्षी डिजिटल व्यवहारांनी उसळी मारत 4,374.45 टक्यांचा आकडा गाठला. तीन वर्षांच्या आकडेवारीचा हिशेब मांडता तब्बल 88 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

UPI ची जादू

तर दुसरीकडे युपीआय या भारताच्या स्वतःच्या डिजिटल पेमेंट एप्लिकेशनला ही भारतीयांनी पसंत नोंदविली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात 22 अब्जांहून अधिक व्यवहार युपीआय मार्फत करण्यात आले आहे. बाजारातील युपीआय वापरकर्त्यांचा वाढता आकडाही दिलासादायक आहे. जानेवारी 2020 मध्ये युपीआयमाध्यमातून 8.1 टक्के व्यवहार पूर्ण झाले होते. तर मार्च 2021 मध्ये हे प्रमाम 11.7 टक्क्यांवर गेले आणि दोन महिन्यांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात हा आकडा 20.3 टक्के वाढला. म्हणजे दोन वर्षात युपीआय माध्यमातून व्यवहार करणा-यांची संख्या दुपट्टीहून अधिक झाली आहे. युपीआय ची बाजारातील सर्वात दोन निष्णात खेळाडू फोन पे आणि गुगल पे सोबत टक्कर सुरु आहे. फोन पे द्वारे देशात 46.3 टक्के तर गुगल पे च्या सहाय्याने 36.4 टक्के व्यवहार पूर्ण झाले आहेत. 2016 साली युपीआय या भारतीय डिजिटल पेमेंट एप्लिकेशनचा अवतार बाजारात उतरविण्यात आला होता.
संबंधित बातम्या : 

डेडलाईन संपली तर सोडावे लागेल 7 लाखांवर पाणी, ई-नॉमिनेशन फॉर्म भरा नुकसान टाळा; EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट

Home Loan | कमाईवर नको गृहकर्जाचा भार, योग्य EMI निवडल्यास आर्थिक ओढाताण टळणार