DJ अंगावर पडला! नवरदेव नवरी डान्स करणार एवढ्यात…धक्कादायक व्हिडीओ!

व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. खरंतर व्हायरल क्लिपमध्ये वधू-वर डीजेच्या तालावर नाचताना दिसतायत.

DJ अंगावर पडला! नवरदेव नवरी डान्स करणार एवढ्यात...धक्कादायक व्हिडीओ!
Marriage scene
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 03, 2022 | 12:37 PM

लग्नसोहळ्याशी संबंधित व्हिडिओ लोक सोशल मीडियावर मोठ्या आवडीने पाहतात. विशेष म्हणजे वधू-वरांचा व्हिडिओ काही औरच असतो. कधी नवरी आपल्या अदाकारीने नेटिझन्सची मनं जिंकते, तर कधी आपल्या धमाकेदार डान्स व्हिडिओजमुळे हे कपल इंटरनेटवर धुमाकूळ घालतं. पण आता समोर आलेला व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. खरंतर व्हायरल क्लिपमध्ये वधू-वर डीजेच्या तालावर नाचताना दिसतायत. मग असा अपघात होतो की लोक किंचाळतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये डान्स फ्लोअरवर वधू-वर उभे असल्याचं पाहायला मिळते. डीजेवर जोरदार म्युझिक वाजत आहे.

नवरदेव आपल्या नवरीचा हात धरून डीजेच्या तालावर थिरकणारच होता तेवढ्यात मागून एक भलामोठा साउंड बॉक्स त्याच्या पाठीवर पडतो.

अचानक झालेल्या या अपघातानंतर नवरदेवालाही धक्का बसला आहे. त्याचबरोबर नवरीही खूप नर्व्हस होते. बाकीचे घर लगेच नवरदेवाच्या दिशेने धाव घेते. सुदैवानं कुणीही गंभीर जखमी झालं नाही, पण हा व्हिडिओ जो कोणी पाहिलात्याला मात्र धक्का बसलाय.

लग्नसोहळ्याचा हा व्हिडिओ खरंच धक्कादायक आहे. मात्र, अनेकांना ते गमतीशीरही वाटले आहे. लोक हसण्याच्या इमोजीने प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडिओ gyanendra_703 नावाच्या युझरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला जवळपास 6 हजार लोकांनी लाईक केलं आहे.