Video: अपंग मालकाचं कुत्रं एक पाय झालं, व्हिडीओ पाहा, कळेल, कुत्र्याला माणसाचा निष्ठावान मित्र का म्हणतात!

| Updated on: Oct 15, 2021 | 2:42 PM

तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या कुत्र्यांहून हा कुत्रा वेगळा आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाला आधार देताना दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी कुत्र्याच्या मालकाला एक पाय नाही.

Video: अपंग मालकाचं कुत्रं एक पाय झालं, व्हिडीओ पाहा, कळेल, कुत्र्याला माणसाचा निष्ठावान मित्र का म्हणतात!
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाला आधार देताना दिसत आहे
Follow us on

कुत्र्यांना माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हटलं जातं, ते त्यांच्या मालकाशी खूप निष्ठावान असतात. हे सिद्ध करणारे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असलीत, पण आता व्हायरल होणारा व्हिडीओ खूप सुंदर आहे. आम्हाला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की, तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या कुत्र्यांहून हा कुत्रा वेगळा आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाला आधार देताना दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी कुत्र्याच्या मालकाला एक पाय नाही. (Dog becomes the support system of handicapped owner video will win the hearts)

व्हिडिओमध्ये पाहु शकता की, एखादी व्यक्ती मैदानाच्या काठावर चालताना दिसत आहे, परंतु ती व्यक्ती अपंग आहे हे तुम्ही सर्व व्हिडीओमध्ये पाहू शकता. त्याला पाय नाही आणि तो लाठ्यांच्या मदतीने चालत असल्याचे दिसते. त्याच वेळी, एक कुत्रा मागून येतो आणि त्या बाजूला जातो ज्यावर त्या व्यक्तीला पाय नसतो. तो कुत्रा त्या व्यक्तीचा पाय बनतो आणि त्याला चालण्यास मदत करताना दिसतो. प्रत्येकाला हा व्हिडिओ खूप आवडतो तसेच सोशल मीडिया वापरकर्ते त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ सर्व नेचर पेजवर पाहू शकता. जरी हा व्हिडिओ बराच जुना आहे परंतु तरीही तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिला जात आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत आणि अनेक लाखांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

हेही पाहा:

Video: ट्रेनने रिओचा मुंबई ते भुवनेश्वर प्रवास, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “रिओचा थाटच न्यारा”

Video: डोळ्यावर गॉगल, हातात ट्रॅक्टरचं स्टिअरिंग, आणि जोईचा भन्नाट स्वॅग, ट्रॅक्टर चालवणारा कुत्रा जगभरात का गाजतोय?