Dolly Chaiwala : डॉली चायवाल्यानं घेतली नवीकोरी 32 लाखांची कार, थाट पाहून भलभले अवाक, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल!
नागपूरच्या चहाच्या टपरीवरून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला डॉली चायवाला पुन्हा चर्चेत आला आहे. डॉली चायवाल्याने लाखोंची किंमत असलेली कार खरेदी केली आहे, त्याच्या नव्या कारच्या डिलिव्हरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डॉली चायवाला म्हणजे चहाच्या टपरीवरून थेट सेलिब्रिटीच्या दुनियेत पोहोचलेलं एक भन्नाट व्यक्तिमत्व. नागपूरच्या टपरीवर चहा विकताना त्याने आपली सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या हटके अंदाजाने सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक चाहत्यांचे मन वेधून घेतले होते. त्याची चहा बनवण्याची विकण्याची स्टाईल, हेअरस्टाईल यामुळे तो सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाला. आता हाच डॉली चायवाला पु्न्हा एकदा चर्चेत आलाय तो त्याच्या नव्या कोऱ्या कारमुळे. त्याची एन्ट्री पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे.
चायवाल्याने खरेदी केली ३२ लाखांची कार
व्हायरल व्हिडिओमध्ये डॉली चायवाला ऑटो रिक्षातून कारच्या शोरूममध्ये पोहोचताना दिसतोय. शोरूममध्ये पोहोचल्यानंतर तो कागदांवर सही करतो. त्यानंतर आपल्या नव्या कारची डिलिव्हरी घेतो. कार लाल कपड्याने झाकलेली व्हिडिओमध्ये दिसते आहे. डॉली चायवाल्याने तब्बल ३२ लाखांची Mahindra XUV700 खरेदी केली आहे
कार घेण्यासाठी रिक्षाने एन्ट्री
इथेच डॉलीच्या व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. नवी कार घेण्यासाठी शोरूममध्ये येताना डॉलीने ऑटो रिक्क्षाने प्रवास केला. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या साधेपणाची आणि स्टाईलची चर्चा सुरू आहे. काही जण याला साधेपणा म्हणत आहेत तर काहींना हा डॉलीला ट्रोल करत आहेत.
व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स
डॉलीच्या या व्हिडिओवर सोशल मिडिया यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी याला नव्या कारसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे. सा्धा चायवला कुठल्या कुठे गेला. हीच सोशल मीडियाची ताकद अशा कमेंट्स केल्या आहेत