‘…तर सरकारी नोकरी गेलीच म्हणून समज’, असं काय म्हणाला नवरदेव म्हणून लोक संतापले? Video viral

| Updated on: Mar 08, 2022 | 2:04 PM

Dowry system : एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये हुंडालोभी वर लग्नाला स्पष्टपणे नकार देत आहे, कारण त्याची मागणी मुलीच्या पालकांनी अद्याप पूर्ण केली नाही, असे त्याचे म्हणणे आहे.

...तर सरकारी नोकरी गेलीच म्हणून समज, असं काय म्हणाला नवरदेव म्हणून लोक संतापले? Video viral
हुंडा मागणाऱ्या वराचा व्हायरल व्हिडिओ
Image Credit source: Twitter
Follow us on

Dowry system : देशात आजही हुंडा प्रचलित आहे. हा शाप दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असले, त्यामुळे हुंडा देणारे आणि देणाऱ्यांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे आणि लोकांची विचारसरणी बदलली आहे, परंतु अजूनही अनेक लोक आहेत ज्यांची मानसिकता असे आहे. लोक हुंडा हा आपला हक्क मानतात, जो ते फक्त मुलीच्या लोकांकडून घेतात आणि न मिळाल्यास लग्न (Marriage) मोडतात. आपली मागणी वेळेत पूर्ण न झाल्यास हुंड्याचे लोभी वर लग्नाच्या मंडपातून उठून निघून जातात, असेही अनेकदा दिसून येते. यासंबंधीचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या व्हिडिओमध्ये हुंडालोभी वर लग्नाला स्पष्टपणे नकार देत आहे, कारण त्याची मागणी मुलीच्या पालकांनी अद्याप पूर्ण केली नाही, असे त्याचे म्हणणे आहे.

‘हुंडा सर्वत्र सुरू’

ही घटना बिहारची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वधू आणि वर स्टेजवर बसले आहेत आणि व्हिडिओ बनवणारा एक माणूस वराला विचारतो, की लग्न न करण्याचे कारण काय आहे? याला उत्तर देताना वराचे म्हणणे आहे, की त्यांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही, ना रोख रक्कम मिळाली आहे ना अन्य वस्तू. सोन्याची साखळीही मागितली होती, तीही मिळाली नाही, मग कशाच्या आधारावर लग्न करणार? व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने विचारले असता, वराने सांगितले, की तो सरकारी नोकरी करतो, तर त्याचे वडील शिक्षक आहेत. आता तुम्ही विचार करा, की असे सुशिक्षित लोक हुंडा प्रथेला चालना देत असताना ही प्रथा कशी संपणार? दरम्यान, हुंडा सर्वत्र सुरू आहे, हे वराने सांगितलेली बाब मात्र खरी आहे.

व्हिडिओ तपासून कारवाईची अपेक्षा

हा व्हिडिओ खरा आहे, की स्क्रिप्टेड याची अद्याप खात्री झालेली नाही. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि लिहिले आहे, की जोपर्यंत देशातून हुंडा लोभी मानसिकता संपत नाही तोपर्यंत आपला महिला दिन, महिला सशक्तीकरण दिन इत्यादी साजरा करणे व्यर्थ आहे. जो हुंडा हव्यासापोटी स्वतःच्या स्वाभिमानाचे आणि जीवनसाथीचे मूल्य कमी करतो, तो कोणाचा जीवनसाथी बनण्यास पात्र नाही. व्हिडिओ तपासून कठोर कायदेशीर कारवाई करावी.

वराला केलं लक्ष्य

हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरने वराला निर्लज्ज असे वर्णन केले आहे, तर दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, की कशाच्या आधारावर लग्न करायचे, याचे मंदबुद्धीने अजब उत्तर दिले आहे. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने लिहिले आहे, की जर पकडले गेले तर त्याची सरकारी नोकरी गेलीच म्हणून समजा.

आणखी वाचा :

#IWD2022 : आंतरराष्ट्रीय महिला दिनी यशस्वी व्यक्तींनी महिलांविषयी ‘असा’ व्यक्त केला आदर

आता काम आधार देण्याचं…; पोलंडमधल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ हृदयद्रावक Photo पाहिला का?

Creative wood craft : प्रत्येकाकडे त्याचं सर्वोत्तम असतं, जे तो वेळ आल्यावर देतो..! Video viral