
सोशल मीडियावर सापांच्या रेस्क्यू व्हिडीओ ( Snake Rescue Video ) नेहमीच व्हायरल होत असतो. परंतू अलिकडे समोर आलेला एक व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडेल. एका स्नेक कॅचरचा ( सर्पमित्र ) एक व्हिडीओ व्हायरल आहे. या व्हायरल व्हिडीओत एका सापाची सुटका करीत असताना भिंतीवर चढलेल्या या सापाने अचानक हवेत झेप घेतली. ही झेप पाहून साप पकडणाऱ्याची अवस्था काय झाली असेल हे वेगळे सांगायला नको. व्हायरल क्लिपला पाहून अनेक युजरने आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
एका कुटुंबाच्या गॅलरीतील भिंतीत एक अतिशय बारीक परंतू विषारी साप आल्याने त्यांनी सर्पमित्रांना कॉल केला. या सापाने भिंतीवरच बस्तान मांडले होते. एका सर्पमित्राला त्यांनी घरी बोलावले. या सर्प मित्राने या सापाला साप पकडण्याच्या विशेष काठीने पकडण्याचा प्रयत्न केला खरे. परंतू त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. भिंतीला पाली प्रमाणे चिकटलेला हा साप काढताना या सर्पमित्राने आपल्या स्नेक कॅचर छडीने सापाची मान पकडण्यासाठी काठीचा पक्कडीसारखा पाना उघडला. साप पकडण्यासाठी त्याला खुर्चीवर उभे राहावे लागले. त्याने आपल्या विशिष्ट अवजाराने त्याला कात्रीत पडकण्याचा प्रयत्न केला खरा परंतू विचित्रच घडले.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की स्नेक कॅचरने सापाच्या तोंडा जवळ आपले टुल नेले. परंतू सापाने हा डाव ओळखून आपली मान दुसरीकडे नेली. त्यानंतर पळण्याच्या ऐवजी सापाने सर्पमित्राच्या दिशेने अचानक हवेत झेप घेतली. हवेत झेप घेत सापाने सर्पमित्राच्या डोक्याच्या दिशेने हल्ला केला.
X वरील (आधीचे ट्विटर) @Digital_khan01 या अकाऊंटने हा व्हिडीओ शेअर करीत त्यास एक मजेशीर कॅप्शन लिहीली आहे. सापाला रस्ता दाखवायला गेले होते. सापाने स्वत: घराचा पत्ता विचारला. या हँडलवरुन शगुफ्ता खान नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ पाहून युजरना धक्का बसला आहे.अनेकांनी आश्चर्यचकीत व्यक्त करीत यावर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहीले आहे की सापाचा हा पलटवार हे लक्षात देतो की वन्य प्राण्यांसह जोखीम घेणे भारी पडू शकते. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की सापाने विचार केला असेल भावा तु मेहनत घेऊ नको मीच तुझ्या जवळ येतो ! अनेक युजरनी यास घाबरवणारा रेस्क्यू ऑपरेशन व्हिडीओ म्हटले आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
गए थे साँप को रास्ता दिखाने, साँप ने खुद ही घर का पता पूछ लिया। 😂
साँप का ‘Surprise Attack’ pic.twitter.com/ZO7geSTHoX
— Shagufta khan (@Digital_khan01) January 22, 2026