video viral : टीव्ही स्टुडीओत लाईव्ह दरम्यान भूकंप आला, न्यूज एंकरने केले असे काही, व्हिडीओ जगभर व्हायरल

| Updated on: Mar 22, 2023 | 3:35 PM

एका टीव्ही स्टुडीओमध्ये लाईव्ह प्रसारण सुरू असतानाच भूंकपाच्या लागोपाठ हादऱ्याने स्टुडीओतील सर्व वस्तू हलू लागल्या आणि न्यूज देणारा वृत्तनिवेदकाने जे केले... त्याचा व्हिडीओ जगभर व्हायरल होत आहे.

video viral : टीव्ही स्टुडीओत लाईव्ह दरम्यान भूकंप आला, न्यूज एंकरने केले असे काही, व्हिडीओ जगभर व्हायरल
NEWS TV
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : भूंकपाचे हादरे बसतात तेव्हा भल्याभल्यांची भंबेरी उडत असते. काल उत्तर भारतासह दिल्ली, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आलेल्या भूकंपाने अनेक भागात दहशत पसरली. या भूकंपाचे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात हादरे जाणवले, तेथील एका न्यूज चॅनलच्या वृत्त निवेदकाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, भूंकपाचे हादरे सुरू होताच या वृत्त निवेदकाने असे काही केले की त्याचा व्हिडीओ जगभर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानूसार एका खाजगी चॅनलच्या टीव्ही स्टुडिओतील वृत्तनिवेदनाचे काम लाईव्ह सुरू असतानाच अचानक भूंकपाचे हादरे बसायला सुरूवात झाली. भूंकप येताच स्टुडीओत हंडकंप माजला. न्यूज देण्याचे काम लाईव्ह सुरू असताना भूकंपाची बातमी देणाऱ्यालाच भूकंपाचे हादरे बसु लागले. जमिन हादरू लागली. सर्व टीव्ही स्क्रीन हलू लागले. स्टुडीओतील काही कर्मचारी बॅकग्राऊंडला इकडे तिकडे पळताना दिसू लागले. परंतू तो न्यूज देणारा निवदेक आपले काम करीतच राहिला, बातम्या देतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर भितीचा लवलेश नव्हता. त्याने बातम्या सांगण्याचे त्याचे कर्तव्य सुरूच ठेवल्याचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

भूकंपाने संपूर्ण स्टुडिओ हलू लागला

बातम्या देणाऱ्या वृत्त निवेदकांच्या पाठीमागचे सर्व टीव्ही स्क्रीन देखील भूकंपाच्या हादऱ्याने हलू लागले. स्टुडिओतील इतर उपकरणे देखील हादरू लागली, परंतू बातम्या देणारा एंकर जराही हालला नाही की घाबरला नाही. तो सातत्याने बातम्या सांगत राहिला आणि भूकंपाच्या धक्क्यांनी स्टुडीओ हादरतच राहीला. असे म्हटले जात आहे की पाकिस्तानातील हे एक स्थानिक पश्तो टीव्ही चॅनल आहे. पश्तो टीव्ही चॅनलचा हा स्टुडीओचा नजारा पाहून आपल्याला अंगावरही शहारे येतात. परंतू आपली ड्यूटी फर्स्ट म्हणून कर्तव्य बजावणारा हा वृत्त निवेदक संपूर्ण स्टुडीओ हादरत असताना आपली ड्यूटी करीत राहिला.

एंकरचा हा व्हिडीओ पाहा…

 

या भूकंपाचे केंद्र…

हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यातील एंकरचे सर्वजण कौतूक करू लागले आहेत. त्याच्या धाडसाला आणि कर्तव्यतत्परतेला सर्वजण सलाम करीत आहेत. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या जुर्म शहरापासून 40 किलोमीटर दक्षिण-पूर्व पाकिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमेवर होते. त्याचा हादरा भारतालाही बसला. या व्हिडीओला अनेक जण पाहून त्या अॅंकरच्या धाडसाला मनोमन सलाम करीत आहेत.