VIDEO : साडी नेसलेल्या वयोवृद्ध महिलेने नदीत उडी मारली, व्हिडीओ पाहून अनेकांचे पाय थरथरले

आतापर्यंत त्या व्हिडीओला 53 हजार लोकांनी पाहिला आहे, ट्विटर यूजर्सने महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर चांगल्या कमेंट सुध्दा केल्या आहेत.

VIDEO : साडी नेसलेल्या वयोवृद्ध महिलेने नदीत उडी मारली, व्हिडीओ पाहून अनेकांचे पाय थरथरले
Social media
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 07, 2023 | 3:11 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ (VIDEO) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका साडी नेसलेल्या वयोवृद्ध महिलेने नदीत उडी मारलीचं स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर काही जणांनी महिलेचे कौतुक केले आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ तामिळनाडू (tamailnadu) राज्यातील आहे. आरामात त्या महिलेने नदीत उडी मारल्यामुळे तिचं सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.

व्हायरल झालेला एक व्हिडीओ आईएएस ऑफिसर सुप्रिया साहू यांनी त्यांच्या ट्विटरच्या अकाऊंटवरती शेअर केला आहे. तो व्हिडीओ फक्त २० सेकंदाचा आहे. साडी नेसलेल्या एका महिलेने थमिराबरानी नदीत उत्साहाच्या भरात उडी घेतली आहे. नदीत खालच्या बाजूला काही लोक दिसत आहेत. त्याचबरोबर उडी घेत असताना काही लोकांनी हा प्रकार व्हिडीओत कैद केला आहे. अनेक महिला तिथून पाण्यात बिनधास्त उडी घेतात असं एका वेबसाईटने म्हटलं आहे.

व्हायरल पोस्टमध्ये तमिलनाडुच्या कल्लिदाइकुरिच्या या महिलेला पाहून माझा गोंधळ झाला असल्याचं ऑफिसर सुप्रिया साहू यांनी म्हटलं आहे. तिथून अनेक महिलांनी आतापर्यंत बिनधास्तपणे उडी घेतली आहे. त्याचबरोबर ही गोष्ट प्रेरणादायी असल्याचं सुध्दा म्हटलं आहे.

आतापर्यंत त्या व्हिडीओला 53 हजार लोकांनी पाहिला आहे, ट्विटर यूजर्सने महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर चांगल्या कमेंट सुध्दा केल्या आहेत.

एक युजरने लिहिलं आहे की, खूप चांगला व्हिडीओ आहे, सोमवार सोमवार मुबारक हो!