Real Time Travel : या देशात 7 वर्ष मागे जातात लोक, झटक्यात होतात तरुण; कॅलेंडर पाहून व्हाल थक्क
इथियोपियामधील गीज कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सात वर्षे मागे आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्म तारखेच्या वेगळ्या गणनेमुळे हे अंतर निर्माण झाले आहे. इथियोपियाचं कॅलेंडर 13 महिन्यांचे असून, नवीन वर्ष 11 सप्टेंबरला सुरू होते. पर्यटकांसाठी हे कॅलेंडर एक अनोखे आकर्षण ठरले आहे, त्यांना काळाच्या वेगळ्या परिघात जगण्याचा अनुभव मिळतो.

काळ कुणासाठी थांबत नाही असं म्हटलं जातं. खरोखरच काळ कुणासाठी थांबत नसतो. काळ मुठीत पकडताही येत नसतो. काळ हा नेहमी पुढे पुढे सरकत असतो. म्हणूनच लोकांना आहे त्या काळातच जे काही करायचं ते करण्याचा सल्ला दिला जातो. काळ पुढे गेल्यावर उरतात फक्त आठवणी. पण असाही एक देश आहे. जिथे तुम्ही भूतकाळात जाऊ शकता. तुम्ही एका झटक्यात तरुण होता. या देशातील एक कॅलेंडर तुम्हाला चक्क सात वर्ष मागे घेऊन जातं. आज तुम्ही 2025मध्ये वावरत आहात. पण त्या देशातील लोक आजही 2017मध्ये जगत आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल. काय बावळटपणा लावलाय असं तुम्ही म्हणाल. पण हे खरं आहे. कसं खरं आहे हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. पृथ्वीवरचा हा चमत्कार तुम्हाला उलगडवून दाखवणार आहोत.
इथोपियातील कॅलेंडरने हा चमत्कार घडवलाय. याला गीज कॅलेंडरही म्हटलं जातं. हे जगाच्या ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सात ते आठ वर्षाने मागे आहे. संपूर्ण जग ग्रेगोरियन कॅलेंडरवर चालतं. पण इथोपिया गीज कॅलेंडरनुसार चालतो.
सात वर्ष मागे का ?
या अनोख्या अंतराचं कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्म तारखेच्या गणनेचं अंतर आहे. ग्रेगोरियन कॅलेंडर जगभर वापरलं जातं. हे कॅलेंडर येशू ख्रिस्ताचा जन्म इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाला होता, असं मानतं. पण इथोपियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चच्या मतानुसार, येशू ख्रिस्ताचा जन्म इसवी सणाच्या 7 व्या शतकात झाला होता. या गणनेच्या आधारे इथोपियाचं कॅलेंडर सुरू झालं. त्यामुळे ते सात ते आठ वर्षाने मागे आहे.
याशिवाय इथोपियाचं कॅलेंडर 13 महिन्याचं असतं. तर ग्रोगेरियन कॅलेंडर 12 महिन्याचं असतं. इथोपियामध्ये 12 महिने 30-30 दिवसांचे असतात. 13 वा महिना, ज्याला Pagуме म्हटलं जातं तो पाच किंवा सहा दिवसांचा असतो. हा महिना लीप इयर असतो. सौर चक्राशी ताळमेळ साधावा म्हणून ही अनोखी व्यवस्था करण्यात आली आहे.
नवीन वर्ष आणि सण
इथोपियाचं नवीन वर्ष 11 सप्टेंबरपासून सुरू होतं. लीप ईयरमध्ये नवीन वर्ष 12 सप्टेंबर रोजी होतं. हा काळ पावसाळा संपण्याचा आणि फुलं बहरण्याचा असतो. नव्या सुरुवातीचं हे प्रतिक मानलं जातं. या ठिकाणी ख्रिसमस 25 डिसेंबर ऐवजी 7 जानेवारीला साजरा केला जातो.
खरंच वय कमी होतं?
इथोपियात गेल्यावर वय सात वर्षाने कमी होतं, हे ऐकून थोडी गंमत वाटेल. पण ही केवळ कॅलेंडरच्या काळ गणनेची कमाल आहे. तुम्ही 2025 मध्ये 40 वर्षाचे आहात तर इथोपियाच्या काळगणनेनुसार तिथे 2017 सुरू असल्याने तुमचं वय 33 वर्ष होईल. वयाचं हे मजेदार अंतर पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतंय.
इथोपियाचं कॅलेंडर पर्यटकांना अनोखा अनुभव देत आहे. इथोपियात आल्यावर नैसर्गिक सौंदर्य, प्राचीन चर्च आणि दुर्मीळ वन्यजीव पाहण्याचा आपण आनंद घेतोच. पण काळाच्या एका वेगळ्या परिघातही जगतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे टाइम ट्रॅव्हलर असल्याचा अनुभव आपल्याला मिळतो. पण परदेशी नागरिकांच्या दृष्टीने इथोपियात दोन्ही कॅलेंडरचाही वापर केला जातो.