
नुकतंच एका डॉक्टरनं लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. डॉक्टरांनी लिहिलेल्या हस्ताक्षरामुळे ते व्हायरल झालं होतं. आता अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पेनाने काहीतरी लिहित आहे. पण या व्यक्तीचं लेखन इतकं सुंदर आहे की ते कम्प्युटरवर लिहिलंय की काय असं वाटतं. व्हिडीओ बघून लोक त्याच्या लेखनाचे चाहते बनलेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस हाताने पेनाने काहीतरी लिहिताना दिसत आहे.
व्हिडिओत दिसत आहे की, ही व्यक्ती अतिशय सुंदर लेखन करत आहे. प्रिंटींग मशीनही यासमोर फेल आहे असं वाटतंय. त्याने एक एक शब्द उत्तम प्रकारे लिहिलाय आहे की जो पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.
व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, हा माणूस साध्या पांढऱ्या कागदावर पेनाने काही ओळी लिहितोय. आश्चर्य म्हणजे त्याचे शब्दही तसेच आहेत. म्हणजे जर तो एका ठिकाणी Y हा शब्द लिहीत असेल तर दुसऱ्या ठिकाणी तो अगदी त्याच पद्धतीने Y हा शब्द लिहीत आहे.
The proof why Calligraphy is an art pic.twitter.com/NeZEz7bwRj
— Tansu YEĞEN (@TansuYegen) October 6, 2022
इतकंच नाही तर व्हिडिओच्या शेवटी ही व्यक्ती “सुंदर” हा शब्द इंग्रजीतही लिहिते. हा शब्दही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिला आहे. एका युझरने लिहिले की, माझी इच्छा आहे की, मीही असे लिहू शकेन.