
तुम्ही चित्रपटांमध्ये अनेक किचकट प्रेमकथा पाहिल्या असतील, मात्र खऱ्या आयुष्यातही अनेक अशा लव्हस्टोरी सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक प्रेमकथा सांगणार आहोत, ज्यात अनेक वळणे आहेत. उत्तराखंडमधील ज्वालापूर येथील माजी आमदार सुरेश राठोड आणि अभिनेत्री उर्मिला सनावर यांची ही प्रेमकथा आहे. हे दोघे विवाहित होते, मात्र नंतर ते प्रेमात पडले नंतर ते एकमेकांशी भांडले, मात्र आता ते पुन्हा एकत्र आले आहेत.
माजी आमदार सुरेश राठोड आणि अभिनेत्री उर्मिला सनावर यांच्यातील जुना वाद संपला आहे. दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. आता सुरेश राठोड यांनी उर्मिलाला पत्नी म्हणून स्वीकारले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी उर्मिला सनावर यांनी सुरेश राठोड यांच्यावर आरोप केला होता. ‘सुरेश यांनी मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नेपाळला नेले आणि गंधर्व विवाह केला’ असं उर्मिला यांनी म्हटलं होतं. या लग्नानंतर सुरेश राठोड माझ्यापासून दूर गेले आणि मला एकटे सोडले असंही उर्मिलाने म्हटले होते.
सुरेश राठोडांवर मानसिक छळाचा आरोप
या आरोपांनंतर उर्मिलाने दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यात काही अतिशय खाजगी फोटोंचाही समावेश होता. तसेत तिने सुरेश राठोडवर हल्ला करून मानसिक छळ केल्याचाही आरोप केला होता. तसेच माझ्या घरात काही अज्ञात महिला घुसल्या होत्या असंही उर्मिलाने म्हटलं होतं.
सुरेश राठोड यांनी आरोप फेटाळले
सुरेश राठोड यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते, तसेच उर्मिलावर ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. याबाबक उर्मिलाविरुद्ध एफआयआर देखील दाखल केला होता. तसेच उर्मिलानेही पोलिसांकडेही तक्रार दाखल केली होती, त्यामुळे हे प्रेमप्रकरण चांगलेच चर्चेत होते.
वाद मिटला
काही काळानंतर हे दोघेही प्रसारमाध्यमांसमोर आले आणि त्यांनी वाद मिटल्याचे जाहीर केले. तसेच पुन्हा आपले नाते स्वीकारले.या पत्रकार परिषदेत राठोड म्हणाले की, ‘उर्मिलावरील माझे अजूनही तितकेच प्रेम आहे आणि मी तिच्यासोबत आयुष्य घालवू इच्छितो.’ आता दोघेही त्यांचे मतभेद विसरून एकत्र राहण्यास तयार झाले आहेत.
उर्मिला सनावर काय म्हणाली?
उर्मिला सनावरने प्रसारमाध्यमांसमोर मोठी माहिती दिली. ती म्हणाली की, ‘काही लोकांनी आमच्या वादाचा चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी मला सुरेश यांना अडकवण्याचे आमिष दाखवले होते. काही लोकांनी आमची भांडणे पेटवण्याचाही प्रयत्न केला. परंतु आता सर्व काही संपले आहे.’
दोघेही विवाहित
समोर आलेल्या माहितीनुसार सुरेश राठोड आणि उर्मिला हे दोघेही आधीच विवाहित आहेत आणि त्यांना मुलेही आहेत. मात्र दोघांनीही त्यांच्या पहिल्या कुटुंबांबद्दल काहीही भाष्य केलं नाही. उर्मिला फक्त एवढंच म्हणाली की, ‘सुरेश माझा नवरा होता, आहे आणि राहील. आमचा संघर्ष आता संपला आहे.’