
तुम्हाला माहिती आहे का की फेसबुक मेटा तुमच्या फोनच्या प्रत्येक ऑनलाईन हालचालीवर लक्ष ठेवत आहे. तुम्ही काय शोधता, कोणत्या वेबसाइटला भेट देता आणि कोणत्या ॲप्सशी कनेक्ट करता हे सर्व फोनच्या बँकग्राउंड मध्ये ट्रॅक केले जाते. अनेक वापरकर्त्यांना त्यांचा डेटा कसा आणि केव्हा वापरला जात आहे याची माहिती नसते. पण तुम्ही स्वतः हे ट्रॅकिंग पाहूण बंद करू शकता. तर आजच्या लेखात आपण मेटाला असे करण्यापासून कसे थांबवायचे आणि हे ट्रॅकिंग सेटिंग कसे बंद करायचे ते जाणून घेऊयात.
Meta ने फेसबुक ॲपमध्ये एक ऑप्शन दिले आहे, ज्याद्वारे तुम्ही जाणून घ्याल की फोनच्या कोण-कोणत्या ॲक्टिव्हिटी ट्रॅक केली जात आहे. त्यातच गरज भासल्यास तुम्ही ही ट्रॅकिंग सेटिंग बंद ही करू शकता. तर हे ट्रॅकिंग सेटिंग बंद करण्यासाठी या स्टेप फॉलो करा.
सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये फेसबुक उघडा.
तुमच्या फोनमध्ये फेसबुक ॲप उघडल्यानंतर फेसबुकच्या वरच्या डाव्या बाजूला असलेल्या तीन-ओळींच्या आयकॉनवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तळाशी Settings & Privacy पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून अॅपच्या सेटिंग्ज मध्ये जा
ॲपच्या सेटिंग्ज उघडताच तुम्हाला Accounts Center चे ऑप्शन दिसेल.
तिथे जा आणि Accounts Center मध्ये अधिक पहा वर टॅप करा. पुढील स्क्रीनवर विविध अकाउंट-संबंधित माहिती प्रदर्शित होईल, ज्यामधून तुम्हाला “Your Information and Permissions” या पर्यायाला निवडावे लागेल.
हे सेक्शन पुढे स्क्रोल केल्यावर “Your Activity off Meta Technologies” नावाचा पर्याय दिसेल.
येथे तुम्हाला मेटाने ट्रॅक केलेल्या तुमच्या काही ॲक्टिव्हिटींची स्पष्ट यादी दिसेल. तुम्हाला वाटत असेल आपली ॲक्टिव्हिटी ट्रॅक झालीये तर तुम्ही लगेच त्या तेथूनच क्लिअर करू शकता किंवा विशिष्ट ॲप किंवा वेबसाइटवरून ट्रॅकिंग डिस्कनेक्ट करू शकता. शिवाय जर तुम्हाला भविष्यात तुमच्या ॲक्टिव्हिटी ट्रॅक व्हायला नको असे वाटत असेल तर तुम्ही Manage पर्यायावर जाऊन Disconnect Future Activityनिवडू शकता.
हे सेटिंग बंद केल्याने, मेटा तुमच्या अकाउंटशी लिंक करून तुमच्या पुढील ॲक्टिव्हिटी ट्रॅक करू शकणार नाही. फक्त एका मिनिटात तुम्ही तुमच्या प्रायव्हसीवर नियंत्रण मिळवू शकता. जर तुम्हाला तुमच्या प्रत्येक ऑनलाइन ॲक्टिव्हिटी ट्रॅक होत असेल तर हे सेटिंग तपासा आणि वेळेवर ते बंद करा.