Father Daughter Love: व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, “मुलगीच व्हावी, घरी लक्ष्मी यावी!”

छोटीशी ही मुलगी इतकी गोंडस आहे. हिला पाहिलं की सगळ्यांना वाटेल आपल्यालाही मुलगीच हवी.

Father Daughter Love: व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, मुलगीच व्हावी, घरी लक्ष्मी यावी!
father daughter
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 22, 2022 | 10:55 AM

असं म्हणतात की मुलगी असणं म्हणजे भाग्य असतं. मुली घरात असल्या की घर कसं भरल्या भरल्या सारखं वाटतं. ज्याचं नशीब चांगलं त्याच्याच घरी मुलगी येते. असं बोलण्यामागे अनेक कारणं आहेत. मुली आयुष्यभर साथ निभावतात, आई वडिलांसाठी त्या सगळ्याचा त्याग करू शकतात. खरं तर हे महिलांमध्ये असणारं वैशिष्ट्यच असतं. असाच एक व्हिडीओ आहे ज्यात वडील घरी आले की मुलगा झोपलेला असतो. मुलगी येते आणि आपल्या वडिलांची सेवा करते. छोटीशी ही मुलगी इतकी गोंडस आहे. हिला पाहिलं की सगळ्यांना वाटेल आपल्यालाही मुलगीच हवी.

असे म्हणतात की मुली मोठ्या नशिबाने भेटतात. प्रत्येक बापाच्या नशिबात मुलगी नसते. लोकांनी काही पुण्य केले आहे, तरच त्यांच्या घरात लक्ष्मीच्या रूपात मुली जन्माला येतात.

अजूनही काही घरांमध्ये मुली म्हणजे ओझं आहेत. आजच्या काळातही असा विचार करणारे अनेक जण आहेत. त्याचबरोबर असेही काही आहेत ज्यांना फक्त मुलगीच हवी. असे मानले जाते की मुली त्यांच्या वडिलांच्या अधिक जवळ असतात आणि वडीलही मुलींशी जास्त जोडलेले असतात.

आजकाल या बाप-लेकीच्या अनमोल नात्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचं मन नक्कीच आनंदी होईल आणि कदाचित तुम्हीही भावूक व्हाल.

खरंतर या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी आपल्या वडिलांची सेवा करताना दिसत आहे. वडील कामावरून आले की ही मुलगी कामावरून परतताच त्यांना हात धुवायला, बसायला, जेवण वाढायला मदत करताना दिसते. मग मांडीवर बसून एकत्र जेवण करते. जर तुम्ही एखाद्या मुलीचे वडील असाल तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच भावूक व्हाल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बेडवर एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दरम्यान, वडील आल्याचा आवाज त्यांना ऐकू येतो, त्यानंतर मुलगा ब्लँकेट लावून झोपतो, पण ती छोटी बाहुली लगेच बेडवरून खाली उतरते आणि वडिलांकडे जाऊ लागते.

चेहऱ्यावर हसू आणून ती थेट पाण्याने भरलेल्या बादलीपाशी जाऊन मगातून पाणी काढून वडिलांचे हात धुऊन घेते, सतरंजी घालते आणि मग ताटात जेवण आणते. यानंतर तीही वडिलांच्या मांडीवर बसून जेवू लागते.

चिमुकलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Munnas3436 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अशा आहेत मुली… मुली म्हणजे प्रेम आणि तपश्चर्येच्या देवी आहेत … जय माँ भारती जय माँ भगवती जय श्री राम जी की.” व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही मुलीला आशिर्वाद देताना दिसत आहेत.