Video: मुलाला झोपवण्यासाठी वडिलांनी गिटार वाजवून गायलं गाणं, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सगळा ताण विसराल

| Updated on: Oct 06, 2021 | 10:57 AM

सध्या सोशल मीडियावर एक अतिशय गोंडस व्हिडिओ समोर व्हायरल होतो आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटेल. या व्हिडिओमध्ये वडील आणि मुलाचे प्रेम दिसून येत आहे.

Video: मुलाला झोपवण्यासाठी वडिलांनी गिटार वाजवून गायलं गाणं, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सगळा ताण विसराल
वडिलांना गाणं गाताना पाहून मुलही त्याला शांतपणे मान टाकून ते ऐकत आहे.
Follow us on

माय-लेकराच्या नात्यानंतर सर्वाधिक सुंदर नातं हे वडील आणि मुलाचं असतं. अनेकदा तुम्ही सोशल मीडियावर वडील आणि मुलाचे अनेक सुंदर व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच प्रत्येकजण आनंदी होतो. सध्या सोशल मीडियावर एक अतिशय गोंडस व्हिडिओ समोर व्हायरल होतो आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटेल. या व्हिडिओमध्ये वडील आणि मुलाचे प्रेम दिसून येत आहे. ( Father strums guitar sings a song for his baby video goes viral )

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक वडील आपल्या मुलासोबत दिसत आहेत. वडिलांनी मुलाला आपल्या खांद्यावर झोपवलं आहे. आपल्याकडे जशी आई बाळाला झोपवण्यासाठी अंगाई गाते, तसे हे वडील मुलासाठी गिटार वाजवून गाणं म्हणत आहेत. गिटारच्या तालावर सुंदर गाणं सुरू आहे. वडिलांना गाणं गाताना पाहून मुलही त्याला शांतपणे मान टाकून ते ऐकत आहे. हा व्हिडिओ लोकांची मनं जिंकत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘खरोखर कुणीही हा व्हिडीओ पाहिला तर त्याचा आनंद द्वीगुणीत होईल.’ तर दुसऱ्याने लिहिले की,’माझ्या मते यासारखी दुसरी सुंदर भावना असू शकत नाही.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी तो शेअर करायला सुरुवात केली. परिणामी, आतापर्यंत हा व्हिडिओ अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे.

हा व्हिडिओ 5 ऑक्टोबर रोजी GoodNewsCorrespondent ने ट्विटरवर शेअर केला होता. ज्याला आतापर्यंत 14 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. यासह 300 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर बरेच लोक व्हिडिओवर हृदयस्पर्शी कमेंट्सही करत आहेत. गुड न्यूज कॉरस्पॉन्डंट नावाच्या ट्विटर हँडलवरून असे व्हिडिओ अनेकदा शेअर केले जातात, जे लोकांचा दिवस आनंदीत करतात.

हेही पाहा:

Video: अपना टाईम आयेगा, म्हणत अरुणाचलच्या छोटूने गायलं रॅप सॉंग, नेटकरी म्हणाले, ‘हे ओरिजनल पेक्षाही भारी’

Video | पूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं, तब्बल 25 गाई वाहून गेल्या, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ