
हिंदी चित्रपटसृष्टीतील असा एक चित्रपट, ज्यामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांना लावलं होत वेड. 23 वर्षीय तरुणीचा गावातील लोक घेतात गैरफायदा. फ्रीमध्ये Youtube पाहू शकता चित्रपट.

सध्या अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड आणि इंटिमेट सीन दाखवले जातात. मात्र जवळपास दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला एक चित्रपट त्याच्या कथानक आणि मांडणीमुळे तो विशेष चर्चेत आला होता. या चित्रपटातील धाडसी विषय आणि काही बोल्ड सीन हे खूपच व्हायरल झाले होते.

हा चित्रपट प्रामुख्याने महिला सशक्तीकरण आणि ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांवर आधारित आहे. मात्र त्यातील काही सीनमुळे आणि मांडणीमुळे हा चित्रपट सर्वच प्रेक्षकांना पसंत पडला नाही. या चित्रपटाचे नाव आहे 'भौरी'.

भौरी हा चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असून समाजातील काही कठोर वास्तव दाखवण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा 23 वर्षांच्या भौरी नावाच्या तरुणीभोवती फिरते. तिचे लग्न तिच्यापेक्षा खूप मोठ्या वयाच्या आणि आजारी असलेल्या पुरुषाशी लावले जाते.

भौरी अत्यंत सुंदर असल्यामुळे गावातील अनेक पुरुष तिच्याकडे आकर्षित होतात. पती आजारी पडल्यानंतर गावातील काही प्रभावशाली लोक तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून चित्रपटात महिलांचे स्वातंत्र्य, हक्क, सामाजिक बंधने, शोषण आणि आत्मनिर्णय यांसारखे महत्त्वाचे विषय दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

भौरी हा चित्रपट कमी बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाचा अंदाजे बजेट 1 ते 2 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. मात्र या चित्रपटाने अंदाजे 1 कोटी रुपयांच्या आसपासच कमाई केली. मात्र, डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताच चित्रपटाला प्रचंड प्रेक्षक मिळाले.