उद्यानात कुत्रा हरवलाय! गोंधळून टाकणारं कोडं…

या चित्रात एका उद्यानाचे दृश्य दर्शविले गेले आहे ज्यात तुम्ही एक बेंच आणि आजूबाजूला बरीच हिरवळ पाहू शकता. तसेच काही अंतरावर दुसरे बेंचही पाहता येईल.

उद्यानात कुत्रा हरवलाय! गोंधळून टाकणारं कोडं...
Find the dog
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 01, 2022 | 9:44 AM

ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे गोंधळून टाकणारी चित्र असतात जे तुम्हाला आव्हान देतात आणि तुमच्या निरीक्षण कौशल्यांची परीक्षा घेतात. अनेकदा अशी चित्रं समोर येतात, ज्यात तुम्हाला काही ना काही प्राणी शोधावा लागतो. हे तुमच्यासाठी आणखी एक आव्हान आहे. हे चित्र आपल्या निरीक्षण कौशल्याची चाचणी घेण्यासाठी आहे. ही चाचणी काही सेकंदांचीच आहे आणि त्यात यशस्वी झालात तर तुम्ही स्वत:ला जिनियस म्हणवून घेऊ शकता.

या चित्रात एका उद्यानाचे दृश्य दर्शविले गेले आहे ज्यात तुम्ही एक बेंच आणि आजूबाजूला बरीच हिरवळ पाहू शकता. तसेच काही अंतरावर दुसरे बेंचही पाहता येईल.

उद्याने, झाडे, बेंच या दोनच गोष्टी या चित्रात आहेत असं नाही. या चित्रात एक कुत्राही आहे आणि कुत्रा शोधण्यासाठी आपल्याकडे फक्त ११ सेकंद आहेत.

जर तुम्ही स्वत:ला प्रतिभावान समजत असाल, तर दिलेल्या कालावधीत हे आव्हान पूर्ण करा. ऑप्टिकल भ्रमाशी संबंधित आव्हाने ही आपली बुद्धिमत्ता आणि आपली निरीक्षण कौशल्ये या दोन्हींचे मूल्यांकन करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये एक कुत्रा आहे आणि प्रथमदर्शनी कुत्रा शोधणे कठीण काम आहे. उत्तम निरीक्षण कौशल्य असलेले लोक लवकरात लवकर कुत्रा शोधू शकतात.

कुत्रा चित्रात कुठे लपलेला आहे हे आपल्याला शोधावे लागेल आणि तेही फक्त ११ सेकंदात. ज्यांना अद्याप याचं उत्तर सापडलेलं नाही त्यांच्यासाठी एक उपाय देखील आहे.

कुत्रा बाकाच्या उजव्या बाजूला आहे.या पगचा चेहरा बेंचच्या हँडमधून दिसून येतो.

Here is the answer