विमानाने प्रवास करताय? आधी ही व्हायरल पोस्ट बघा

| Updated on: Nov 04, 2022 | 1:34 PM

विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी सामान ठेवताना केलेल्या चुकांमुळे अनेकदा माल गहाळ किंवा खराब होतो.

विमानाने प्रवास करताय? आधी ही व्हायरल पोस्ट बघा
damaged suitcase
Image Credit source: Social Media
Follow us on

विमानात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना प्रवाशांना जी चिंता असते, ती म्हणजे त्यांच्या सामानाचे नुकसान होण्याची चिंता. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी सामान ठेवताना केलेल्या चुकांमुळे अनेकदा माल गहाळ किंवा खराब होतो. व्हायरल रेडिट पोस्टमध्ये अशा घटनेचा फोटो पाहायला मिळतोय. या पोस्टमध्ये पूर्णपणे खराब झालेली सुटकेस दिसतेय. प्रवाशाच्या भाच्याने खराब झालेल्या सुटकेसचा फोटो ऑनलाइन पोस्ट केला आणि त्याच्या एका फोटोद्वारे त्याच्या काकांची सुटकेस कशी खराब झाली हे लोकांना दाखवले. ही बॅग एका थ्रॅश मशीनमध्ये ठेवण्यात आली असे दिसते.

सोशल मीडिया साईट रेडिटवर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “माझ्या काकांची सुटकेस त्यांच्या फ्लाईटनंतर.’ वरून खालपर्यंत बॅग पूर्णपणे खराब झाली होती आणि समोरचा झिपचा भाग अर्धा कापून उघडा ठेवला होता.

सुटकेसच्या व्हायरल पोस्टमुळे प्रवाशांमध्ये सामानाची चिंता निर्माण झाली. सुटकेसची अवस्था पाहून इंटरनेट युझर्सनी नाराजी व्यक्त करत या समस्येला कसं सामोरं जायचं असा प्रश्न विचारलाय.

एका युजरने लिहिले की, “फ्लाइट लँड झाली होती का, की त्यांनी ते वाटेत फेकून दिले होते?” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, “मी विचार करत होतो की विमान खरोखरच क्रॅश झाले आहे की काय.”

व्हायरल फोटोमध्ये सामान पूर्णपणे खराब झालेले दिसत आहे. या पोस्टवर ९७ हजारहून अधिक रिप्लाय आणि ४,६०० हून अधिक कमेंट्स आहेत.