Floating Cargo Ship: कॅमेऱ्यात नकळत टिपला अद्भुत अविश्वसणीय नजारा! 32 मिलियन लोकांनी पाहिला VIDEO; नेटकरी झाले हैराण..
जहाजाच्या सांगाड्याखालील गडद पाण्याच्या पट्ट्यामुळे, जहाज समुद्राच्या पृष्ठभागावर हवेत तरंगत असल्याचा भास होतो. हे अनोखे दृश्य मूळचा केरळमधील कोझिकोडचा रहिवासी असलेल्या २८ वर्षीय जसील पेरालासेरीने शूट केले आहे. तो 'जसील अझीझ' या नावानेही ओळखला जातो. या व्हिडिओला सोशल मीडियावर तब्बल 31 मिलियन व्ह्यूज मिळालेत. या व्हिडिओमुळे जसील रातोरात स्टार झाला आहे.

Floating Cargo Ship Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी भन्नाट डान्स तर कधी भररस्त्यात वाद.. इंटरनेटवरील अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात असा काही अद्भुत नजारा टिपला आहे की जो पाहून नेटकरी हैराण झालेत. कारण या व्हिडिओमध्ये हवेत तरंगणारे कार्गो जहाज दिसत आहे. नेमकी काय आहे या व्हिडिओमागची व्हायरल स्टोरी? वाचा…
कॅमेऱ्यात नकळत टिपला, अद्भुत, अविश्वसनीय नजारा..!
हा व्हिडिओ संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अजमानच्या किनाऱ्यावरील आहे. व्हिडिओमध्ये एक मोठे मालवाहू जहाज दिसत आहे, ज्याचा लांब डेक आणि पांढरा सांगाडा निळ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर स्पष्टपणे दिसत आहे. जहाजाच्या सांगाड्याखालील गडद पाण्याच्या पट्ट्यामुळे, जहाज समुद्राच्या पृष्ठभागावर हवेत तरंगत असल्याचा भास होतो. हे अनोखे दृश्य मूळचा केरळमधील कोझिकोडचा रहिवासी असलेल्या २८ वर्षीय जसील पेरालासेरीने शूट केले आहे. तो ‘जसील अझीझ’ या नावानेही ओळखला जातो. या व्हिडिओला सोशल मीडियावर तब्बल 31 मिलियन व्ह्यूज मिळालेत. या व्हिडिओमुळे जसील रातोरात स्टार झाला आहे.
याबाबत बोलताना जसीलने सांगितले की, अजमानमध्ये एक शूटिंग पूर्ण केल्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यांसोबत समुद्रकिनाऱ्यावर गेला होता. एका विलक्षण गोष्टीने त्याचे लक्ष वेधून घेतले. समुद्राकडे पाहिल्यावर त्याला दूरवर काही जहाजे दिसली, जी पाण्यावर तरंगत असल्यासारखी वाटत होती. त्यांच्या सांगाड्यांमध्ये आणि समुद्राच्या पृष्ठभागामध्ये एक मोकळी जागा दिसत होती.
व्हिडिओला तब्बल 32 मिलियन VIEWS, फोटोग्राफर झाला रातोरात स्टार!
उत्सुकतेपोटी, त्याने लगेच आपला फोन काढला आणि हे अनोखे दृश्य रेकॉर्ड केले. हा व्हिडिओ ऑनलाइन इतका लोकप्रिय होईल याची त्याला कल्पना नव्हती. जेव्हा त्याने ते अनोखे दृश्य पाहिले, तेव्हा त्याने ते थेट ऑनलाइन पोस्ट केले. “मी फक्त चित्रीकरण केले आणि पोस्ट केले. त्या व्हिडिओला २० तासांत ३१ दशलक्ष व्ह्यूज मिळाले. असे काही घडेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.”