Video: जेरीने टॉमला ‘जेरीस’ आणलं, अगदी समोर बसुनही उंदराने मांजराला गंडवलं, पाहा व्हिडीओ

मांजर टायरभोवती उंदीर शोधत आहे, पण बराच वेळ शोधल्यानंतरही तिला उंदीर सापडत नाही. पण तो उंदीर त्या मांजरीच्या डोळ्यांसमोरच बसला आहे.

Video: जेरीने टॉमला जेरीस आणलं, अगदी समोर बसुनही उंदराने मांजराला गंडवलं, पाहा व्हिडीओ
मांजर उंदराला शोधत आहे, पण उंदिर अगदी तिच्या समोरच बसला आहे.
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 4:06 PM

प्रत्येकानं ‘उंदीर-मांजराचं वैर’ या वाक्याबद्दल ऐकलं असेलच आणि प्रत्येकाला त्याचा अर्थ देखील माहित असेल. पण तुम्ही कधी मांजर आणि उंदीराला समोरासमोर लढताना पाहिले आहे का? जर नाही, तर आजकाल असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला टॉम अँड जेरीची भांडणांची आठवण होईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की, मांजर टायरभोवती उंदीर शोधत आहे, पण बराच वेळ शोधल्यानंतरही तिला उंदीर सापडत नाही. त्याच वेळी, या व्हिडिओतील सर्वात मनोरंजक गोष्ट घडते, तो उंदीर त्या मांजरीच्या डोळ्यांसमोरच बसला आहे. खरं तर, या टायरच्या रिमवर गंज चढला आहे आणि उंदीरच्या शरीराचा रंग त्याच्याशी अगदी हुबेहुब जुळतो, त्यामुळे उंदीर समोर असूनही मांजराला तो दिसत नाही. ( funny animal viral video of cat and rat people will remind tom and jerry )

व्हिडीओ पाहा:

हा मजेदार व्हिडिओ ट्विटर युजर डॉक्टर अजयिता यांनी शेअर केला आहे. त्यानी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘विश्वास ठेवा की, तुम्ही त्याला पाहू शकत नाही, हाच खरा टॉम आणि जेरी आहे! हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकरी त्यावर मजेदार कमेंट्स करत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. अनेक युजर्सनी मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली की,’याला डोळ्यात धूळ फेकणं असं म्हणतात.’ त्याचवेळी दुसऱ्याने लिहिलं, ‘हाच खरा टॉम आणि जेरी आहे.’ या व्यतिरिक्त, इतर अनेक नेटकऱ्यंनीनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

हेही पाहा:

 

Video: ‘मेरे प्यारे साथियो’ म्हणत कॉमेडियन श्याम रंगिलाकडून मोदींची भन्नाट मिमिक्री, व्हिडीओ तुफान व्हायरल

Video: ‘स्प्लेंडर’चा ‘ब्लेंडर’ म्हणून वापर, भुईमूग मुळापासून वेगळा करण्यासाठी बळीराजाचा अनोखा जुगाड