AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganeshotsav 2022 : लोअर परळ स्टेशनवर थेट गणपती बाप्पा अवतरलाय… हो, पण हे खरंय का?

जे खऱ्या अर्थाने मुंबईची भूक भागवतात, अंगात पांढरा सदरा, पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी घालून आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या घरचं जेवण खाऊ घालतात ते म्हणजे " मुंबईचे डब्बेवाले ". यावेळेस बाप्पाने त्याचं रूप घेतलेलं आहे.

Ganeshotsav 2022 : लोअर परळ स्टेशनवर थेट गणपती बाप्पा अवतरलाय... हो, पण हे खरंय का?
गणपतीमध्ये काय आहे विशेष Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 01, 2022 | 4:39 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) गणपती महोत्सव (Ganeshotsav 2022) उत्साहात साजरा केला जातो. तसेच प्रत्येकवर्षी महाराष्ट्रात बाप्पाची विविध रुपे मुर्तीच्या रुपात पाहायला मिळतात. देशात अनेक ठिकाणी गणोशोत्सव उत्साहात साजरा होतो. हैदराबादला सुध्दा खूप मोठे गणपती पाहायला मिळतात. यंदा पुष्पा अवतार असलेल्या अनेक गणेश मुर्ती बाजारात अधिक आहेत. त्यामुळे गणेश मंडळांनी पुष्पा मुर्तीला अधिक प्राधान्य दिले आहे. सध्या लोअर परेल (Lower Parel) स्थानकात बाप्पा बसल्याचं चित्र तुम्हाला दिसत आहे.

गणपतीमध्ये काय आहे विशेष

जे खऱ्या अर्थाने मुंबईची भूक भागवतात, अंगात पांढरा सदरा, पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी घालून आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या घरचं जेवण खाऊ घालतात ते म्हणजे ” मुंबईचे डब्बेवाले “. यावेळेस बाप्पाने त्याचं रूप घेतलेलं आहे. आपली सुखाची, समाधानाची आणि चैतन्याची भूक तो भागवणार आहे.. बोला गणपती बाप्पा…

कोणाची आहे कल्पना

मुंबईचा डबेवाला ही संकल्पना : कविता पाटील, मूर्तिकार : शार्दूल सावंत, लेखन: कुणाल पवार, कला दिग्दर्शक : केतन दुदवडकर, सहाय्यक कला दिग्दर्शक : प्रसाद कळसकर , नियती कांबळे, चित्रकार : जमशेद, छाया चित्रण : चिन्मय जाधव, प्रकाश योजना : सिदधेश वाडेकर, ओमकार पवार, निमंत्रक : करण पाटील आणि पाटील परिवार, स्थळ: शक्ती पार्क डिलाई रोड परिसरात हा देखावा तयार करण्यात आला आहे.

लोकांची गर्दी

तयार करण्यात आलेला हा देखावा अनेकांच्या पसंतीला पडला आहे. तसेच देखाव्याचा फोटो देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिथं अनेक भक्त भेट देत आहेत. त्याचबरोबर लोक व्हिडीओ काढून सोशल मीडियावरती शेअर करीत आहेत.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल