Viral Video : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात कचऱ्याचा ढीग? Viral Video ने उडवली खळबळ

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा तरंगताना दिसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकांनी स्वच्छतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच हा व्हिडिओ खरा आहे की ai यावर शंका उपस्थित केली जात आहे.

Viral Video : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात कचऱ्याचा ढीग? Viral Video ने उडवली खळबळ
virla video gate way of india
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 3:52 PM

मुंबईची ओळख म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल. जगभरातून लाखो पर्यटक मुंबईत फिरायला येतात. मुंबईची लोकल, मुंबईची धावती जीवनशैली, मुंबईकरांचा स्पिरिट हे देखील पर्यटकांचे आकर्षण आहे.पण सध्या मुंबईत एक मोठा प्रॉब्लेम आहे तो कचऱ्याचा, रस्त्याशेजारी, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, झोपडपट्यांच्या भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग दिसतात. पण आता तोच कचरा मुंबईची शान समजल्या जाणाऱ्या गेटवे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात तरंगताना दिसतोय.याचसंबंधातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ अंक बक्षी नावाच्या मुलाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.व्हिडिओमध्ये सुरूवातील गेटवे ऑफ इंडियाचा परिसर दिसतो आणि त्यानंतर व्हिडिओत समुद्राचे पाणी दिसते. कचरा असलेला समुद्राचा तो भाग घाणेरडा आणि काळा झालेला दिसत आहे. पाण्यावर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटल्या, चिप्सची पाकिटं आणि बराच कचरा तरंगताना दिसत आहे.परिसरात या कचऱ्याचा दुर्गंध देखील पसरला आहे. इथला नजारा पाहून व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.

Loading...

 


 

 

आपण घरात कचरा झाला कि बाहेर टाकतो पण घर स्वच्छ ठेवतो. पण त्या बाहेरच्या कचऱ्याचे काय? घराबाहेर पडल्यानंतर सार्वजनिक जागा ही आपलीच समजावी हेच कायम समजावे. समुद्रिकिनारी काही खाल्ल त्यांच पाकीट, रिकाम्या बाटल्या तिथंच टाकायचं आणि पुढे निघून जायचं. अशी सवय असेल तर शेवटी त्याचा त्रास सर्वांनाच होतो. समुद्राच्या ठिकाणी केलेला कचरा कुठे जाईल, त्याचा काय परिणाम होईल यांची विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडिया यूजर्सनी नागरिकांच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.काही जणांचे म्हणणे आहे की, स्वच्छतेबद्दल फक्त बोलणंच पुरेसं नाही,तर प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून कचरा योग्य ठिकाणी टाकला पाहिजे. एका यूजरने तर या प्रकरणात संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी केंद्र सरकारला टॅग करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

मात्र काही लोकांनी या व्हिडिओबाबत शंकाही व्यक्त केली आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की असा कचरा तिकडे नाहीच आहे. हा व्हिडिओ व्ह्यूज मिळवण्यासाठी तयार केला गेला आहे. हा व्हिडिओ Ai आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us