पाव्हणं जेवला काय?…. गौतमी पाटीलचं ठसकेबाज आवतन

“जेवला काय" हे नवीन गाणं सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यांचं गाण्यावर गौतमी पाटील हिने एका सार्वजानिक कार्यक्रमामध्ये डान्स केला आहे.

पाव्हणं जेवला काय?.... गौतमी पाटीलचं ठसकेबाज आवतन
gautami patil new
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2022 | 2:19 PM

सध्या सोशल मीडियावर अनेक जण प्रसिद्धीसाठी काही अतरंगी व्हिडीओ तयार करत असतात. त्या पैकी काही व्हिडीओना सर्वात जास्त प्रसिद्धी मिळते आणि ते एका रात्रीत स्टार होऊन जातात. असाच एक डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ गौतमी पाटील (Gautami Patil)हीचा असून त्यामध्ये ती ‘पाव्हणं जेवला काय’ (Pavan Jevala Kay )या गाण्यावर बेभान होऊन डान्स करत असल्याचं दिसत आहे.


तिचे डान्सचे व्हिडीओ हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा चंद्रा गाण्यावरील डान्स आणि त्यामधील मनमोहक अदांनी चाहत्यांना भुरळ घातली होती. तिच्या डान्समधील काही स्टेप्सवर चाहते आणि काही कलाकार देखील नाराज झाले होते. तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जात होती.

गौतमी पाटीलचं ठसकेबाज आवतन

“जेवला काय” हे नवीन गाणं सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे गाणं अवधूत गुप्ते यांनी लिहिलं आहे. यांचं गाण्यावर गौतमी पाटील हिने एका सार्वजानिक कार्यक्रमामध्ये डान्स केला आहे. तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने लाल रंगाच्या साडीमध्ये हा डान्स केला आहे. ज्यात ती खुप सुंदर दिसत आहे.

तिच्या या डान्सने चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या प्रत्येक डान्सच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा असते. तिचे कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी असते. तिच्या पाव्हणं जेवला काय या गाण्यावरच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतं आहे.