Gay Couple Wedding: समलिंगी जोडप्याचं हिंदू रितीरिवाजानुसार धूमधडाक्यात लग्न; पाहा फोटो

कोलकाता शहरात समलैंगिक विवाह होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. परंतु विवाहात हिंदू रितीरिवाजांचं पालन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Gay Couple Wedding: समलिंगी जोडप्याचं हिंदू रितीरिवाजानुसार धूमधडाक्यात लग्न; पाहा फोटो
Gay Couple Wedding
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 11:17 AM

कोलकातामध्ये (Kolkata) पार पडलेल्या एका लग्नसोहळ्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. हे लग्न समलिंगी जोडप्यामुळे (Gay Couple Wedding) खूप चर्चेत आहे. फॅशन डिझायनर अभिषेक रे यांनी त्यांचा जोडीदार चैतन्य शर्माशी धूमधडाक्यात लग्न केलं. या विवाहामुळे LGBTQ+ समुदाय हा समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हा लग्नसोहळा हिंदू रितीरिवाजानुसार झाला होता. यामध्ये पंडितांनी मंत्रोच्चार केला, तर जोडप्याने एकमेकांना पुष्पहारही घातला. अभिषेक (Abhishek Ray) आणि चैतन्य (Chaitanya Sharma) यांनी अग्निसमोर प्रदक्षिणाही घेतल्या. कोलकाता शहरात समलैंगिक विवाह होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. परंतु विवाहात हिंदू रितीरिवाजांचं पालन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अभिषेक रे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं की, “LGBTQ+ समुदायातील बहुतेक लोक लिव्ह-इनमध्ये राहतात किंवा घरात छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित करून एकत्र राहतात. पण आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी चैतन्यला सांगितलं की आपण ते अशा प्रकारे केलं पाहिजे की ते आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी संस्मरणीय असेल.” अभिषेक पुढे सांगतो, “हे लग्न बंगाली आणि मारवाडी कुटुंबात झालं होतं, त्यामुळे दोन्ही कुटुंबांच्या रितीरिवाजानुसार लग्न पार पडलं.”

पहा फोटो-

लग्नाला उपस्थित असलेले फॅशन डिझायनर नवोनील दास म्हणाले की, “लग्नाच्या साईनबोर्डवर दोन पुरुष ‘आम्ही लग्न करू’ म्हणत असल्याने बघणाऱ्यांच्या मनात कुतूहल निर्माण होतं. रे आणि शर्मा यांना हे ठाऊक आहे की भारतात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाही आणि विवाहाची नोंदणी केली जाऊ शकत नाही, परंतु ते गुन्हेगारी कृत्यसुद्धा नाही.”

पहा फोटो-

ज्या पंडितांनी रे आणि शर्मा यांचा विवाह केला ते देखील या अनोख्या लग्नाला ‘अत्यंत प्रगतीशील’ मानतात. त्यांच्या मते हे समलिंगी जोडपं म्हणजे एक नवीन मार्ग आहे. त्यांनी असंही सांगितलं की, लग्नादरम्यान त्यांना लिंगविशिष्टतेमुळे अनेकवेळा मंत्रजप करताना समस्यांना सामोरं जावं लागलं.