Video : चक्क झाड पोखरून आरामात झोपला महाकाय अजगर; बाहेर काढताच केलं असं काही की…व्हिडीओ पाहून घाबरून जाल!

महाकाय अजगर झाडाच्या खोडात लपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.

Video : चक्क झाड पोखरून आरामात झोपला महाकाय अजगर; बाहेर काढताच केलं असं काही की...व्हिडीओ पाहून घाबरून जाल!
snake viral video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 8:11 PM

झाड म्हणजे पक्ष्यांच घर असत हे आपल्याला माहित आहे. पण झाडाच्या खोडात कधी साप झोपलेला पाहिलाय का? सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे बघूनच लोकांची घाबरगुंडी उडाली आहे. महाकाय अजगराची ही थरारक झलक कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

झाडाच्या खोडात महाकाय अजगर

व्हायरल व्हिडिओमध्ये सुरूवातीला एक तरूण तुटलेल्या झाडाच्या खोडावरून माती बाजूला करताना दिसत आहे. नुसतीच माती तर आहे असे सुरूवातीला वाटते. पण माती बाजूला करून काहीतरी चमकल्याचे दिसते. हळूहळू जशी माती बाजूला केली जाते, तसाच त्यातून एका महाकाय अजगराची कांती दिसते. खोडाच्या बारकाश्या भागात साप वेटोळे मारून झोपला होता. हळूहळू करून तो माणूस संपूर्ण अजगर बाहेर काढतो. वर वर पाहिल्यावर बारकासा वाटणार अजगर प्रचंड महाकाय आणि ताकदवान दिसत आहे. जवळपास त्या माणसाहूनही तो उंच आहे.

 

 

 

 

अजगर बाहेर येताच हल्ला

तो तरूण त्या महाकाय अजगराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अजगर बाहेर येताच त्याने पकडणाऱ्या माणसाच्या दिशेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा चावा घेण्याचा प्रयत्न करताना दिसला. काही क्षणापूर्वी शांत असलेला हा अजगर स्वरक्षणासाठी आक्रमक झाल्याचा व्हिडिओत दिसत आहे.

व्हिडिओ पाहून नेटकरीही हादरले

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झाडाच्या आत एवढा मोठा अजगर लपून बसला होता हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. नेटकऱ्यांनी यावर अनेक कमेंट्स करत अशा महाकाय अजगरांना सांभाळताना काळजी घेण्याचे सांगितले आहे. तर काहींना एवढ्या मोठ्या अजगराला पाहून धडकी भरल्याचं सांगितलं आहे. काही मिनिटांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us