
सोशल मीडियावर एका एक वेगवेगळे व्हिडिओ येत असतात. काही व्हिडिओ नजर थांबवून ठेवतात. सध्या अशाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील युवतीने धोका पत्कारुन प्रचंड धाडस केले आहे. तिने झाडाच्या सर्वोच्च टोकावर चढून क्लासिकल डान्स केला आहे. बॉलीवूड चित्रपटाच्या धूनवर डान्स केला आहे. तसेच ‘राम दूत हनुमान का नारा…’ या भजनावर नृत्य केले आहे. त्याच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या कॉमेंट येत आहेत.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ miss_pooja_official_887 या अकाउंटवरुन टाकण्यात आला आहे. त्यामध्ये युवती झाडाच्या टोकावर चढली आहे. विशेष म्हणजे अगदी बारीक फांदीवर चढून ती डान्स करत आहेत. ती ‘चैन मेरा तूने ले लिया..’ गाण्यावर डान्स करत आहे. तिचा हा डान्स चांगला झाला असला तरी भीती निर्माण करणार आहे. ती फांदी जर तुटली तर काय होणार? असा युजर विचारत आहे.
रिल बनवून फेमस होण्यासाठी युवतीने केलेला हा प्रकार धोकादायक आहे. हा निष्काळजीपणा तिला अडचणीत आणणार ठरु शकला असता. तिने फॉलोअर्स वाढवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलेला दिसत आहे. कोणताही सपोर्ट न घेती ती युवती बिनधास्त डान्स करत आहे. ती नृत्य चांगले करीत असली तरी हे साहस धोकादायक आहे.
हे दृश्य पाहून एका युजरने लिहिले आहे की, ‘भारतीय नृत्य एवढ्या उंचीवर पोहोचले आहे… मला ते कळलेच नाही.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘मी झाड पडण्याची वाट पाहत होतो.’ आणखी एकाने लिहिले आहे की, ‘ पापा की परी.’ इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ लाखो लोकांनी पहिला आहे. त्याला हजारो जणांनी लाईक केले आहे.