बेडरुममध्ये मुलीने लपवलेले रहस्य, नेहमी ठेवायची बंद, रुम उघडली तर अंगावर काटा आला Video

Viral Video: एका मुलीच्या बेडरुमचा हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. या मुलीने आपल्या बेडरुमचे हे रहस्य कोणाला सांगितले नव्हते. अचानक ती तिच्या बेडरुममध्ये येते आणि पहाणाऱ्यांच्या अंगावर काटाच येतो.

बेडरुममध्ये मुलीने लपवलेले रहस्य, नेहमी ठेवायची बंद, रुम उघडली तर अंगावर काटा आला Video
| Updated on: Aug 24, 2025 | 9:47 PM

Viral Video: जगभरातील कोणत्याही घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर लागलीच व्हायरल होत असते. आता चीनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओपासून लोकांना हादरा बसला आहे. हा एका मुलीच्या बेडरुमचा व्हिडीओ आहे. ज्याला पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आणि अंगावर सणकन काटा येतो असा हा खतरनाक व्हिडीओ आहे.

या मुलीने तिच्या बेडरुममध्ये सापांचा ढीग करुन ठेवला आहे. तिच्या बिछान्याखाली शेकडो साप अक्षरश: वळवळताना दिसत आहे. मुलगी बेडरुममध्ये गेल्यानंतर चादर हटवते आणि किंचाळते. अखेर हे प्रकरण काय आहे हे पाहूयात. वास्तविक ही मुलगी सापांची शेती करते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की आरामात सापांना हाताळते आणि हटवते तसेच बिछाना स्वच्छ करते. व्हिडीओच्या मते मुलगी तिच्या बेडरुमला नेहमी बंद ठेवत असायची त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला आता जाणे शक्य नव्हते.

खोलीत रजईने ही मुलगी बिछाना झाकून ठेवायची. मुलीने ही रुम उघडली आणि रजई हटवली तर पुढील दृश्य पाहून अनेक पाहणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. मुलीने स्वत:च्या बेडरुमला असा प्रकारे स्नेक फार्मिंग म्हणजे सापांच्या शेतीसाठी वापरल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. रजईच्या उबेने साप आरामात रहात आहे. व्हिडीओतील नजारा पाहून युजर्स हैराण झालेले आहेत. कोणी विचारही करु शकत नाही की बिछान्याच्या खाली इतके साप रहात असतील.

येथे पहा व्हिडीओ –

ही मुलगी तिच्या घरात सापांची शेती करत आहे. चीनमध्ये स्नेक फार्मिंगचे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. चीनमध्ये स्नेक फार्मिंग शिवाय इतर सरपटणाऱ्या जीवांची देखील शेती केली जाते. एका रिपोर्टनुसार चीनमध्ये साप, पाली आणि कोळी सारख्या जीवांच्या फार्मिंगचे प्रमाण वाढत आहे. परंतू मुलीचा हा व्हिडीओ निश्चितच हैराण करणारा आहे. कारण तिने स्वत:च्या बेडरुमचाच वापर स्नेक फार्मिंगसाठी केलेला आहे.हा व्हिडीओ जेवढा धक्कादायक आहे तेव्हा धोकादायक देखील आहे.