‘स्वत:ला हिरो समजता ना… मग या प्रश्नाचं उत्तर द्या!’ पत्नीनं नवरोबाला दिलं Challenge, Video viral

| Updated on: Mar 08, 2022 | 8:30 AM

Girl To Woman : मार्च (March) महिन्यातली 8 तारीख... जागतिक महिला दिन (World womens day).. महिलांसंबंधीचे काही हटके आणि मजेशीर असे व्हिडिओ (Video) यादिवशी व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

स्वत:ला हिरो समजता ना... मग या प्रश्नाचं उत्तर द्या! पत्नीनं नवरोबाला दिलं Challenge, Video viral
पतीदेवाला चॅलेंज देणारी पत्नी
Image Credit source: Youtube
Follow us on

Girl To Woman : मार्च (March) महिन्यातली 8 तारीख… जागतिक महिला दिन (World womens day)… कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात एका महिलेचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मग ती आई असो, बहीण असो, पत्नी असो वा इतर कोणतंही नातं असो. आपल्या मुलाला घडवण्यात आईचा मोलाचा वाटा असतो. अशा महिलांप्रति आदरभाव व्यक्त करण्याच्या उद्देशानं जगभरात महिला दिन उत्साहात साजरा केला जातो. महिलांसंबंधीचे काही हटके आणि मजेशीर असे व्हिडिओ (Video) यादिवशी व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. विवाह झालेलं नवीन जोडपं मग त्यांचं प्रेम, भांडण आदींचे व्हिडिओ आपण नेहमीच पाहत असतो. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक नवीनच लग्न झालेली मुलगी आपल्या पतीसोबत आहे आणि तिनं पतीला एक अनोखा प्रश्न केला आहे.

पतीदेवांना चॅलेंज

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, की एक युवती आणि एक युवक दिसतोय. त्यांच्यात मजामस्ती सुरू आहे. शब्दांचे खेळ सुरू आहेत. ती म्हणते, पतीदेव तुम्ही स्वत:ला खूप हुशार समजता ना, स्वत:ला हिरो समजता ना, मग माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या. पतीदेवही उत्साहात म्हणतात, विचार. मग पत्नी विचारते, की असा कोणता तीन अक्षरी शब्द आहे, ज्यामुळे मुलगी एक महिला होते? म्हणजेच मुलीचं आयुष्य एका जबाबदार महिलेमध्ये होतं? पतीदेवांना काहीतरी मस्करी केल्यासारखं वाटतं. ते म्हणतात, काहीतरी वाईट उत्तर असेल याचं. पण मग ती म्हणते, मी तुम्हाला असा कसा प्रश्न विचारेल?

यूट्यूबवर अपलोड

व्हिडिओमध्ये तर उत्तर दिलेलं नाही. मात्र यूझर्स भरभरून यावर कमेंट्स करून उत्तर देत आहेत. या सर्व कमेंट्स वाचण्यासारख्या आहेत. यूट्यूबवर हा व्हिडिओ व्ही जे भाटिया (VJ Rahul Bhatia) या चॅनेलवर अपलोड करण्यात आलाय. ‘Girl To Woman‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. 4 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला व्ह्यूजही चांगले मिळत आहेत. 1,649,477+ यूझर्सनी हा व्हिडिओ पाहिलाय. (Video courtesy – VJ Rahul Bhatia)

आणखी वाचा :

Viral : ‘माफी मागतो, पुन्हा बदाम विकणार’, असं का म्हणाला भुबन बद्याकर? वाचा…

Kid shocking video : जिराफाला खाऊ घालायला जातो चिमुरडा आणि होतं असं काही, की आई-वडिलांना फुटतो घाम!

‘असे’ आनंदाचे क्षण नवी आशा देतील? रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ‘हा’ भावुक video होतोय Viral