AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : ‘माफी मागतो, पुन्हा बदाम विकणार’, असं का म्हणाला भुबन बद्याकर? वाचा…

Bhuban Badyakar apologize : 'कच्चा बदाम' (Kacha badam) हे गाणे (Song) गाऊन रातोरात इंटरनेटवर (Social media) अधिराज्य गाजवणारा भुबन बद्याकर सध्या पुन्हा चर्चेत आहे. आपल्या वक्तव्यावर माफी मागितली असून, आपण पुन्हा बदाम विकणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

Viral : 'माफी मागतो, पुन्हा बदाम विकणार', असं का म्हणाला भुबन बद्याकर? वाचा...
गाण्याचं रेकॉर्डिंग करताना भुबन बद्याकरImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 07, 2022 | 1:40 PM
Share

Bhuban Badyakar apologize : ‘कच्चा बदाम’ (Kacha badam) हे गाणे (Song) गाऊन रातोरात इंटरनेटवर (Social media) अधिराज्य गाजवणारा भुबन बद्याकर सध्या पुन्हा चर्चेत आहे. नुकतेच, त्याने एका वक्तव्यात म्हटले होते, की तो आता सुपरस्टार झाला आहे, त्यामुळे यापुढे बदाम नाही विकणार. मात्र, आता त्याने आपल्या वक्तव्यावर माफी मागितली असून, आपण पुन्हा बदाम विकणार असल्याचे म्हटले आहे. नुकताच भुबनचा अपघात झाला होता. त्याने एक कार घेतली होती, जी तो चालवायला शिकत होता. त्यानंतर त्याच्या कारला अपघात झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. त्यांचे एक नवीन गाणेही येत आहे, या गाण्याचे रेकॉर्डिंग पश्चिम बंगालमधील बोलपूर येथील गोधुली स्टुडिओमध्ये झाले आहे. ज्यामध्ये तो त्याच्या अपघाताची कहाणी जगासमोर आणत आहे.

सौरव गांगुलींनीही केले होते आमंत्रित

भुवनला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या ‘दादागिरी’ या टेलिव्हिजन शोमध्येही आमंत्रित करण्यात आले होते. जिथे त्याचा सन्मानही करण्यात आला. नुकताच तो लोकांच्या निशाण्यावर आला होता, जेव्हा त्याने सांगितले, की तो आता सेलिब्रिटी झाला आहे, त्यामुळे तो बदाम विकणार नाही. या वक्तव्यावर त्याने आता माफी मागितली आहे. सेलिब्रेटींसोबत काय होते याची मला कल्पना नाही, असेही ते म्हणाले.

‘सेलिब्रेटीचा अर्थच समजला नाही’

गरज पडल्यास पुन्हा बदाम विकणार असल्याचे भुबनने सांगितले. सेलिब्रेटीचा अर्थच समजला नसल्याचे भुबन याने सांगितले. आज सर्वजण माझ्यासोबत आहेत. ज्या दिवशी लोक आपली साथ सोडतील, त्या दिवशी पुन्हा बदाम विकणार असल्याचे तो म्हणाला. त्याने आपल्या मुलासाठी सेकंड हँड कार खरेदी केली होती. जेणेकरून त्याचा मुलगा कार चालवून उदरनिर्वाह करू शकेल. मात्र, शिकत असताना कार भिंतीवर आदळल्याने त्याचा अपघात झाला.

आणखी वाचा :

काका ऐकत नाहीत आता..! Michael Jacksonलाही दिलीय टक्कर, Viral dance video पाहून हसून हसून लोटपोट व्हाल

Funny Video viral : ‘जय महाराष्ट्र, हरहर महादेव, जय बजरंग बली, काका, काकू, मामा, मामी…; पाळण्यात बसल्यावर मुलाला हे काय झालं?

Kid shocking video : जिराफाला खाऊ घालायला जातो चिमुरडा आणि होतं असं काही, की आई-वडिलांना फुटतो घाम!

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.