‘कच्चा बादाम’चा गायक कार अपघातात जखमी; रुग्णालयात दाखल, छातीला दुखापत

कच्चा बादाम गाणे ज्यांनी गायिले आहे ते गायक भूबन बड्याकर यांचा सोमवारी रात्री अपघात होऊन जखमी झाले. या अपघातानंतर त्यांना पश्चिम बंगालमधील बीरभूममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'कच्चा बादाम'चा गायक कार अपघातात जखमी; रुग्णालयात दाखल, छातीला दुखापत
kacha badam singer bhuban bafyakarImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 12:08 AM

मुंबईः कच्चा बादाम गाणे ज्यांनी गायिले आहे ते गायक भूबन बड्याकर (singer bhuban Badayakar ) यांचा सोमवारी रात्री अपघात (Accident )होऊन जखमी झाले. या अपघातानंतर त्यांना पश्चिम बंगालमधील बीरभूममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अपघातानंतर असे समजले की, ते एक जुनी कार घेऊन चालवण्यास शिकत होते. त्यांच्या कारचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या छातीला आणि दोन ठिकाणी जखम झाली आहे. सध्या ते रुग्णालयात दाखल झाले असून त्यांची तब्बेत सुधारत असल्याचे डॉक्टरांना सांगितले आहे.

कच्चा बादाम (Kacha Badam)हे गाणं म्हणून ज्यांनी सगळा सोशल मीडिया कच्चा बादाममय करुन टाकला होता, ते भूबन बड्याकर हे पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कुरालजुरी गावातील राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. भूबन अजूनपर्यंत शेंगदाणे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

सोशल मीडियामुळ जगभर पोहचले

सोशल मीडियाच्या या काळात आपल्याला ग्राहक मिळावा म्हणून त्यांनी काचा बादाम हे लिहून त्या गीताला त्यांनी आपल्याच आवाजात सूरबद्ध केले. त्यानंतर हे गाणं बघणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांनी हे गाणं सोशल मीडियावर शेअर केले. ते बघता बघता इतके व्हायरल झाले की, त्याचे रसिक अगदी परदेशातही झाले, आणि शेंगदाणे विकणारा भूबन हा अख्ख्या जगात प्रसिद्ध झाला. कचा बादाम हे गाणं गाऊन रातोरात सेलेब्रिटी झालेले भूबन यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ते शेंगदाणे विकून आपले घर चालवतात. त्यांचे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते, त्यांच्या या गाण्याची भूरळ दिग्गज कलाकारांनाही पडली होती.

म्युझिक कंपनीचा लाखो रुपयांचा चेक

त्यांचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका म्युझिक कंपनीने त्यांना लाखो रुपयांचा चेक दिला आणि त्यांच्या सोबत गाण्यांचा व्हिडिओ केला. त्यांच्या या गाण्यानंतर त्यांना अनेक टीव्हीच्या कार्यक्रमातून त्यांना संधी मिळू लागली.

सरकारने कायमस्वरूपी घर द्यावे

सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम नसली तरी त्यांनी आता शेंगदाणे विकणे बंद केले आहे. ते म्हणतात की आता मी शेंगदाणे विकणे बंद केले आहे, कारण आता अनेक जण मी सेलिब्रेटी असल्यासारखा माझ्यासोबत सेल्फी घेतात. ते बडे सेलिब्रेटी नसले तरी त्यांना आता सरकारने आपल्याला कायमस्वरुपी एक घर द्यावे अशी त्यांची एक इच्छा आहे.

संबंधित बातम्या

“आमच्या सुविद्य पत्नी संयोगिताराजेंनी माझ्यावर गनिमी कावा केला”, संभाजी छत्रपती असं का म्हणाले?

Russia Ukraine War : यूक्रेन यूरोपीय यूनियनमध्ये सहभागी होणार! राष्ट्रपती जेलेन्स्की यांची अर्जावर स्वाक्षरी

‘डॉक्टर मारायच्या लायकीचे, त्यांच्याकडे कधी जाऊ नका!’ संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.