“आमच्या सुविद्य पत्नी संयोगिताराजेंनी माझ्यावर गनिमी कावा केला”, संभाजी छत्रपती असं का म्हणाले?

संभाजी छत्रपती यांच्या उपोषणाच्या काळात त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती (Sanyogitaraje) मंचासमोर तीन दिवस उपस्थित राहून आमरण उपोषणाचं आणि मराठा आंदोलकांचं धैर्य वाढवत होत्या.

आमच्या सुविद्य पत्नी संयोगिताराजेंनी माझ्यावर गनिमी कावा केला, संभाजी छत्रपती असं का म्हणाले?
संयोगिताराजे छत्रपती यांनी देखील तीन दिवस उपोषण केलंImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 11:32 PM

मुंबई: खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati )यांनी मराठा समाजाच्या (Maratha) विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. संभाजी छत्रपती यांनी आझाद मैदानवार उपोषण सुरु केलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून संभाजी छत्रपती यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकारनं मागण्या मान्य करत आमरण उपोषण मागं घेण्याचं आवाहन केलं. राज्य सरकारच्या वतीनं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खासदार राहूल शेवाळे आणि माजी मंत्रि विजय शिवतारे उपस्थित होते. संभाजी छत्रपती यांच्या उपोषणाच्या काळात त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती (Sanyogitaraje) मंचासमोर तीन दिवस उपस्थित राहून आमरण उपोषणाचं आणि मराठा आंदोलकांचं धैर्य वाढवत होत्या. आज संभाजी छत्रपती यांनी उपोषण सोडताना एक गुपित उघड केलं. आमच्या सुविद्य पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी माझ्यावर गनिमी कावा केला, दररोज दिवसभर थांबायच्या आणि रात्री झोपायला जायच्या. मी त्यांना फिट राहायचं सांगितलं होतं. पण त्यांनी देखील उपोषण केलं, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

पाहा व्हिडीओ

संयोगिताराजे काय म्हणाल्या? संभाजी छत्रपती यांच्याशी खोट बोलले कारण त्यांना हे टेन्शन सहन झालं नसतं. त्यांच्या डोक्यात अनेक प्रकारचे स्ट्रेस होते. राजेंची प्रकृती आणि प्रकृती खराब झाल्यास दुसरीकडे प्रश्न सुटण्यावर परिणाम होऊ नये याची काळजी होती. पत्नी म्हणून संभाजीरांचे काळजी होती आणि आई म्हणून समाजाची काळजी होती. राजेंनी वडील म्हणून मी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. तो व्यवस्थित जावा आरक्षण हा लढा लांबचा आहे. आता जे आपल्या हातात पडू शकतो, त्यावर आपला समाज जगू शकतो, मोठा होऊ शकतो याासाठी हा लढा महत्त्वाचा आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले,

संयोगिताराजेंनी संभाजी छत्रपतींच्या हस्ते उपोषण सोडलं संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला सुरवात केली होती. दुसरीकडे त्यांच्या पत्नी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होत्या. संयोगिताराजे उपोषणाच्या काळात मंचासमोर बसलेल्या असायच्या. संयोगिताराजे यांनी देखील उपोषण केलं होतं. त्याचा उलगडा आज झाला. त्यापूर्वी त्या भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. अखेर आज संभाजी छत्रपतींनी संयोगिताराजे यांच्या हस्ते उपोषण सोडलं. तर, संभाजी छत्रपती यांच्या हस्ते संयोगिताराजे यांनी उपोषण सोडलं.

इतर बातम्या:

VIDEO: राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य, अखेर खासदार संभाजी छत्रपतींकडून उपोषण मागे

संभाजी छत्रपती यांनी उपोषण करत केलेल्या मागण्या, सरकारनं मान्य केलेल्या मागण्या, वाचा एका क्लिक वर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.