
हल्ली रिल्सचा जमाना आहे. सोशल मीडियावर अनेकदा असे काही व्हायरल होते की लोक त्यावर रिल्स बनवू लागतात. काही दिवसांपूर्वी ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाणं ट्रेंडमध्ये होतं, ज्यावर एका पाकिस्तानी मुलीने पहिल्यांदा डान्स करून खळबळ उडवून दिली आणि यानंतर ‘पतली कमरिया मोरी’ हे भोजपुरी गाणं ट्रेंडमध्ये आलं. लोकांनी त्यावर जोरदार रिल्सही केल्या. अजूनही बनवत आहेत. सध्या सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही मुली या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून तुमचंही मन प्रसन्न होईल.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलींचे दोन गट आहेत, ज्यात एका बाजूला वेस्टर्न ड्रेस घातलेल्या मुली रांगेत उभ्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला साडी नेसलेल्या मुली आहेत. मग बॅकग्राऊंडमध्ये ‘पतली कमरिया मोरी’ हे गाणं वाजतं. दोन्ही गटातील मुलींची केमिस्ट्री जबरदस्त आहे. विशेषत: साडी नेसलेल्या, मुली कुणालाही वेड लावतात.
साड्यांसोबतच मेकअपही त्यांना खूप सूट करत असतो. त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडली आहे. या गाण्यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स आणि व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण अशी स्पर्धा तुम्ही क्वचितच पाहिली असेल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर harshithareddy_artistry नावाच्या आयडीसह मुलींचा हा भन्नाट डान्स व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 4.6 मिलियन वेळा पाहिला गेला आहे, तर 46 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे. यावरून हा व्हिडिओ लोकांना किती आवडत आहे हे समजू शकते.