VIDEO: ईदसाठी बाजारात विक्रीला आणलेला बोकड मालकाला मिठी मारून हुंदके देत ढसाढसा रडला; सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक बोकड विक्रीच्या वेळी मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे अश्रू अनावर झाले आहेत.

VIDEO: ईदसाठी बाजारात विक्रीला आणलेला बोकड मालकाला मिठी मारून हुंदके देत ढसाढसा रडला; सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी
Goat hugs owner and cried, video goes viral
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 07, 2025 | 3:34 PM

मुक्या प्राण्यांवर केलं तर ते दुप्पट तुमच्यावर प्रेम करतात. आणि याचा अनुभही प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच घेतला असेल. कारण प्राण्यांना बोलत येत नसलं तरी त्यांनाही भावना असतात हे खरं आहे. आणि याचचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एका बोकडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा आपल्या मालकाच्या गळ्यात पडून अक्षरशः हुंदके देत ढसाढसा रडू लागतो. रडणाऱ्या या बकऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल हे नक्की.

बोकड मालकाला मिठी मारून ढसाढसा रडायला लागला 

ईदसाठी बोकड बाजारात कुर्बानीसाठी विकायला आणले जातात. तसाच एक व्यक्ती त्याचा बकरा विकण्यासाठी बाजारात घेऊन आला होता. पण जेव्हा त्या बकऱ्याला कळत की त्याच्या मालकाने त्याला विकण्यासाठी आणलं आहे. तेव्हा तो मालकाच्या गळ्यात पडून , त्याला मिठी मारून ढसाढसा रडायला लागतो. हे दृश्य पाहून तिथे असलेले बाकीचे लोकही भावूक झाले आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.या रडणाऱ्या बोकडाचा हा व्हिडिओ आताचा नसून 2022 चा. पण आता या बकरी ईदच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.


कोणीही अश्रू रोखू शकले नाही

बोकडाचा रडण्याचा आवाज तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच ऐकून आश्चर्य वाटलं आणि वाईटही वाटलं त्यामुळे त्यावेळी कोणीही आपले अश्रू रोखू शकले नाही. मालकानेही बोकडाला मिठी मारली अन् त्याचा अश्रू पुसून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ कुठला आहे याची मात्र पुष्टी झालेली नाही.

बाजारात बोकडांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते

बकरी ईद दिवशी बोकडांची कुर्बानी दिली जाते. नंतर त्या मांसाचे तीन भाग केले जातात. एक स्वतःसाठी, दुसरा नातेवाईकांसाठी आणि तिसरा गरिबांसाठी. बकरी ईदच्या दिवशी बाजारात विक्रीसाठी मोठ्या संख्येने बोकडं आणली जातात.