Video | लहान मुलासारखी बकऱ्यांची मस्ती, उतारावर रंगला घसरगुंडीचा खेळ, व्हिडीओ व्हायरल

सध्या बकऱ्यांचा असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा मूड अगदीच फ्रेश झाला आहे.

Video | लहान मुलासारखी बकऱ्यांची मस्ती, उतारावर रंगला घसरगुंडीचा खेळ, व्हिडीओ व्हायरल
goat viral vid
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 5:39 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजाच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. सध्या बकऱ्यांचा असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा मूड अगदीच फ्रेश झाला आहे. (Goat playing sliding game video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही बकऱ्या दिसत आहेत. या बकऱ्या एका उतारावर बसून घसरगुंडी खेळत आहेत. थोडासा उतार दिसताच त्यासुद्धा लहान मुलांसारखे या उतावर चढून पुन्हा घरंगळत खाली येत आहेत. शेळ्यांची ही करामत नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून खुश झाले आहेत.

बकऱ्या घसरगुंडी खेळताना पाहून नेटकरी खुश

घसरगुंडी खेळणाऱ्या बकऱ्यांना पाहून नेटकऱ्यांनी हजारो प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून आम्हाला आमच्या बालपणीचे दिवस आठवले असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ अतिशय छान असल्याचे सांगितलेय. व्हिडीओ पाहून अतिशय आनंद झाल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या ghantaa या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आला असून त्याला समर्पक कॅप्शनसुद्धा देण्यात आले आहे. जीवनात सर्वांनी आनंद घ्यायला पाहिजे असे या व्हिडीओला कॅप्शन दिलेले आहे. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

Video | नको तिथे स्पर्श करताच महिला खवळली, तरुणांची केली चांगलीच धुलाई, व्हिडीओ पाहाच !

Video | हिमाचल प्रदेशात ढगफुटी, नद्यांना पूर, वाहनेही गेली वाहून, व्हिडीओ व्हायरल

रोटी बनवताना व्हायरल झाला एका सुंदर पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ, जाणून घ्या कोण आहे ही मुलगी?

(Goat playing sliding game video went viral on social media)