Job For Lazy People: आळशी आणि दु:खी लोकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; अट फक्त एकच, मुलाखतीला येताना अंघोळ करुन या

ही जाहिरात एका दुकानाबाहेर लागली आहे. मात्र याचे लोकेशन समजू शकलेले नाही. इग्रंजी भाषेत ही जाहीरात आहे. नोकरीसाठी आवश्यक असेलली पात्रता आणि यासाठी असलेली अट यामुळे ही जाहिरात सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

Job For Lazy People: आळशी आणि दु:खी लोकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; अट फक्त एकच, मुलाखतीला येताना अंघोळ करुन या
| Updated on: Jul 02, 2022 | 9:43 PM

दिल्ली : सध्या बेरोजगारी ही जागतिक समस्या आहे. अद्यापही अनेक जण बेरोजगार असून नोकरीच्या शोधात असतात. इथे भल्या भल्यांना नोकरी मिळत नाही. त्यात आळशी(lazy) आणि दु:खी लोकांसाठी(Miserable People ) जॉब मिळवणे म्हणजे महा कठिण काम. अशाच आळशी आणि दु:खी लोकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी(Job opportunities) आबहे. मात्र, ज्याने या नोकरीसाठी ठेवलेली विचित्र अट सध्या सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

ही जाहिरात एका दुकानाबाहेर लागली आहे. मात्र याचे लोकेशन समजू शकलेले नाही. इग्रंजी भाषेत ही जाहीरात आहे. नोकरीसाठी आवश्यक असेलली पात्रता आणि यासाठी असलेली अट यामुळे ही जाहिरात सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

नोकरीसाठी योग्यता, पात्रता आणि अनुभवाची गरज असते. त्यानुसार कर्मचारी कामावर ठेवले जाता. मात्र या जाहीरातीतील नोकरीसाठी कोणत्याही पदवीची किंवा कौशल्याची गरज नाही. ही नोकरी मिळवण्यासाठी दोन गुणांची आवश्यकता हवी.

आळशी आणि दु:खी असलेल्यांनाच ही नोकरी दिली जाणार आहे. तसे या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींसाठी एक विचित्र अट देखील ठेवण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तींने मुलाखतीसाठी येताना अंघोळ करून या असे जाहिरातीत म्हंटले आहे.

या जाहिरातीचा फोटो एका व्यक्तीने त्याचा फोटो ट्विटरवर अपलोड केला. ही जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वांत वरती ठळक फॉन्टमध्ये लिहिले आहे स्टाफची आवश्यकता आहे. यानंतर त्यांना उमेदवारांची गरज कशी आहे हे सांगण्यात आले आहे. फोटोमध्ये लिहिले आहे की, उमेदवार आळशी आणि दु:खी असला पाहिजे ज्यामुळे तो येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मिसळू शकेल. तसेच सीव्ही घेऊन इथे या आणि येण्यापूर्वी अंघोळ करा असे त्यात नमूद केले आहे.

सध्या ट्विटरवर ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली आहे. या जाहिरातीवर भन्नाट कमेंट्स देखील येत आहेत. एका दुकानाच्या बाहेर ही जाहिरात लागली आहे.