कोरियन महिलेने चाखले 10 फ्लेवर्सचे गोलगप्पे, हा फ्लेवर भिडला काळजाला!

एक कोरियन महिला साडी नेसून पाणीपुरी विक्रेत्याजवळ उभी राहून गोलगप्पांचा आनंद घेत आहे.

कोरियन महिलेने चाखले 10 फ्लेवर्सचे गोलगप्पे, हा फ्लेवर भिडला काळजाला!
Korean Influencer tasted panipuri
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 12, 2023 | 5:43 PM

सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ शेअर केले जातात. त्यापैकी बहुतेक असे लोक आहेत जे त्यांच्या वेगळ्या आणि अनोख्या शैलीमुळे लोकांची पसंतीस उतरतात. हे व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर मन भरत नाही आणि लोकांना ते पुन्हा पुन्हा बघायला आवडतात. असे व्हिडिओ पटकन व्हायरल होतात. आजकाल असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. ज्यामध्ये आपल्या गोलगप्प्याची चव कोरियन महिलेच्या हृदयाला भिडलीये.

गोलगप्पा (पाणीपुरी) हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. हवामान कोणतेही असो, गोलगप्पाप्रेमी ते सतत खाण्यास तयार असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही केवळ देशी महिलांचीच नाही तर परदेशी महिलांचीही पहिली पसंती आहे. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक कोरियन महिला देसी गोलगप्पा चाखताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कोरियन महिला साडी नेसून पाणीपुरी विक्रेत्याजवळ उभी राहून गोलगप्पांचा आनंद घेत आहे. तिने १० प्रकारचे गोलगप्पा चाखले आणि नंतर सर्वांना रेटिंग दिले.

या गोलगप्पांमध्ये ती चिंच, हज्मा, हिंग, जलजीरा, पुदिना, लसूण आणि इतर फ्लेवर्स ट्राय करतेय. ही चव चाखल्यानंतर पुदिन्याला ९ गुण मिळाले. तर लसूण आणि लिंबाला पूर्ण गुण देण्यात आले होते.

व्हिडिओमध्ये दिसणारी महिला मेगी किम आहे, जी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ७४ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.

एका युझरने लिहिले, ‘गोलगप्पा कुणालाही आपलंसं करू शकतो…’ तर दुसऱ्या युझरने लिहिले, ‘गोलगप्पांसाठी चिंचेचे पाणी अंडररेटेड आहे.”