Google Gemini AI 5 व्हायरल प्रॉम्प्ट; प्री वेडिंग ते सेलिब्रिटींसारखे मिळेल फोटो, कसं करायचं?
गुगलच्या जेमिनी AI ने फोटो एडिटिंगचे सगळेच वेडे झाले आहेत. सगळ्यांच्याच फोनमध्ये आता हे फोटो दिसत आहेत. पण आता फक्त स्वत:चेच नाही तर आणखी पाच व्हायरल प्रॉम्प्ट्स वापरून तुम्ही प्री वेडिंग ते सेलिब्रिटींसोबतही फोटो क्रिएट करू शकता.

गुगलचे नॅना बनाना एआय इमेज एडिटिंग टुलने सोशल मीडिया युजर्सना अक्षरशः वेड लावलंय. 3D Figurine Images ट्रेंडला प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर आता या फ्री टुलच्या मदतीने लोक दररोज क्रीएटिव्ह पद्धतीने फोटो एडिट करत असल्याचं दिसत आहे. जवळपास सर्वांच्याच स्टेटसला असे AI फोटो पाहायला मिळत आहेत.
नॅनो बनाना अॅपच्या मदतीने युजर्स अतिशय कमी वेळात आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही विशेष कौशल्याविनाच काही सेकंदांमध्ये फोटो एटिड करू शकतात. आकर्षक फोटो तयार करण्यासाठी लोकांना केवळ योग्य प्रॉम्प्टची आवश्यक आहे. कारण जर तुम्हाला हवे असणारे प्रॉम्प्टचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच क्रिएटीव्ह फोटो तुम्ही बनवू शकता. प्री वेडिंग ते सेलिब्रिटींसोबतही तुम्ही मिळेल क्रिएट करू शकता त्यासाठी योग्य प्रॉम्प्ट वापरता आले पाहिजेत. सध्या व्हायरल होत असलेल्या पाच प्रॉम्प्ट्सचा वापर तुम्ही कसे करू शकता हे जाणून घेऊयात.
प्री वेडिंग फोटो, सेलिब्रिटींसोबत स्वतःचे पोलरॉइड स्टाइलमधील फोटोंसह वेगवेगळ्या क्रीएटिव्ह पद्धतीने फोटो तयार केले जात आहेत.
व्हायरल जेमिनी एआय प्रॉम्प्ट्स कोणते आहेत? आणि ते कसे वापरावे जाणून घेऊयात
हा ट्रेंड फॉलो करण्यासाठी अॅपमध्ये साइन करा किंवा साइटचाही वापर करू शकता. जसं तुम्ही स्वतःचा आताचा किंवा कोणताही जूना फोटो अपलोड करा. यानंतर “Click a cute polaroid picture of my older self hugging my younger self.” हे प्रॉम्प्ट त्यात टाका. जेमिनी काही सेकंदात तुम्हाला हवा असणारा फोटो तयार करून देईल.
Al Saree Prompt- यात स्वतःचा फोटो अपलोड करा आणि हा प्रॉम्प्ट कमांड बॉक्समध्ये पेस्ट करा. आणि पुढील प्रॉम्प्ट तुम्ही वापरू शकता. जसं की,
1.Transform me into a vintage Bollywood heroine wearing a flowing red chiffon saree.
2. Style my hair in soft waves. Set the background with a warm, golden sunset light, minimalist design and a romantic, dramatic atmosphere.
3D Figure Prompt. यात थ्रीडी मॉडेल इमेज लुक मिळवण्यासाठी पुढील प्रॉम्प्टचा वापर करू शकता जसं की,
1. Create a highly detailed 1/7 scale figurine of the person in the image, displayed on a transparent acrylic base on a modern wooden desk.
2. Show a computer monitor with the ZBrush interface, wireframes, and textures. Include a BANDAI-style toy box matching the figurine. Add soft natural light from a nearby window with gentle shadows.
Pre-Wedding Photos AI Prompt- यामध्ये प्री वेडिंग फोटो मिळवण्यासाठी या प्रॉम्प्टचा वापर करू शकता, जसं की,
1. Design a pre-wedding photoshoot for an Indian couple at a grand Rajasthani fort. The bride wears a red lehenga with gold embroidery, the groom a sherwani. They pose on stone steps beneath carved arches. Warm sunset light bathes the scene, with marigold petals scattered across the majestic courtyard for a royal touch.
Polaroid Style Pics With Celebrities Prompt-यात तुमचा आणि तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीचा फोटो अपलोड करून तुम्हाला हवा असलेला फोटो मिळवू शकता.त्यासाठी तुम्ही हा प्रॉम्प्ट नक्कीच वापरू शकता. जसं की,
1.”Create a 4K HD, realistic Polaroid-style photo of the people in the uploaded images. They are posing together naturally. Keep their facial features unchanged. Apply a slight blur for a soft, film-like effect. Use consistent warm lighting and a white curtain backdrop to give it a cozy, candid aesthetic.”
तर अशा पद्धतीने प्रॉम्प्ट वापरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे फोटो एडिट करू शकता.
