Google Gemini AI मुळे ChatGPT ला महाधक्का… अवघ्या दोन आठवड्यात असं काय घडलं? प्ले स्टोअरमध्येच मोठा गेम

काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेल्या गुगल जेमिनी अ‍ॅपला लोकांच्या चांगला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. 9 सप्टेंबरपर्यंत या अ‍ॅपने 2.3 कोटी नवीन लोक र्जोडले गेले होते. या अ‍ॅपबद्दल लोकांमध्ये मोठे क्रेझ बघायला मिळतंय.

Google Gemini AI मुळे ChatGPT ला महाधक्का... अवघ्या दोन आठवड्यात असं काय घडलं? प्ले स्टोअरमध्येच मोठा गेम
Google Gemini and ChatGPT
| Updated on: Sep 15, 2025 | 3:17 PM

गुगलचे एआय जेमिनी अ‍ॅप धुमाकूळ घालताना दिसतंय. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच हे अ‍ॅप लॉन्च झालं. विशेष म्हणजे 26 ऑगस्टला लॉंन्च झालेले हे अ‍ॅप अवघ्या दोनच आठवड्यांमध्ये सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या अ‍ॅपपैकी एक बनलंय. लोकांमध्ये या अ‍ॅपबद्दल मोठे क्रेझ हे बघायला मिळतंय. नॅनो बनाना एआय इमेज एडिटिंग फीचर आहे. तिथे तुम्ही स्वत:चे सुंदर असे फोटो तयार करू शकता. तिथे फक्त तुमचा चेहरा वापरला जातो आणि मॉडेलप्रमाणे तुम्ही दिसता. एआय टूल्ससारखेच हे अ‍ॅप आहे. लोक सध्या या अ‍ॅपवर स्वत: चे फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत आहे म्हणजे लाल रंगाच्या साडीवर इंडियन लूक.

काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेल्या या अ‍ॅपला लोकांच्या चांगला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. 9 सप्टेंबरपर्यंत या अ‍ॅपने 2.3 कोटी नवीन लोक जोडले होते. यामध्ये नॅनो बनानाची भूमिका सर्वात महत्वाची राहिली. विशेष म्हणजे फक्त फोटोच नाही तर आपण व्हिडीओही तयार करू शकता. नॅनो बनाना एआय टूल 3D सारखी आकृती तयार करण्यास मदत करते. फक्त फोटो एडिटिंगच नाही तर स्टाईल ट्रान्सफर, फोटो मर्ज देखील करण्याच्या सुविधा यात आहेत.

आपली लहान मुले, आई वडील, पती पत्नी यांची फोटो या अ‍ॅपच्या माध्यमातून बनवली जात आहेत. सोशल मीडियावर विशेष क्रेझ याबद्दल बघायला मिळतंय. अनेकजण आपल्या कुटुंबासोबत फोटो या अ‍ॅपमध्ये तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नुकताच आलेल्या एका रिपोर्टमध्ये या अ‍ॅपबद्दल अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला आहे. हे अ‍ॅप आपण फ्रीमध्ये आणि पैसे देऊनही वापरू शकता.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, नॅनो बनाना वापरून दोन आठवड्यात 50 कोटींहून अधिक फोटो एडिट करण्यात आली आहेत. 9 सप्टेंबरपर्यंत 2.3 कोटींहून अधिक नवीन लोक या अ‍ॅपसोबत जोडले गेले आहेत. हे एआय टूल 3D सारखे फोटो तयार करून देते. यासोबतच तयार केलेला फोटो तुम्ही आरामात डाऊनलोड करू शकता. धमाकेदार बॅटिंग करताना सध्याच्या परिस्थितीला हे अ‍ॅप दिसत आहे.